Agriculture news in Marathi, The rabi season is expected to increase by 30% | Agrowon

नाशिक : रब्बी हंगामाच्या क्षेत्रात ३० टक्‍क्‍यांनी वाढीची शक्यता

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

येसगाव, जि. नाशिक ः दमदार पावसामुळे गाव व परिसरात विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. अद्याप जमिनीतही मोठ्या प्रमाणात ओलावा टिकून आहे. त्यामुळे परिसरात रब्बीच्या क्षेत्रात ३० ते ३५ टक्के वाढ होण्याची शक्‍यता आहे, असे कृषी मंडल अधिकारी आर. व्ही.  पवार यांनी सांगितले.

येसगाव, जि. नाशिक ः दमदार पावसामुळे गाव व परिसरात विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. अद्याप जमिनीतही मोठ्या प्रमाणात ओलावा टिकून आहे. त्यामुळे परिसरात रब्बीच्या क्षेत्रात ३० ते ३५ टक्के वाढ होण्याची शक्‍यता आहे, असे कृषी मंडल अधिकारी आर. व्ही.  पवार यांनी सांगितले.

ऊन पडल्यामुळे बाजरी, मका पिकांची जलद गतीने आवरासावर चालू आहे. खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. गेल्या वर्षी पावसाअभावी दुष्काळ होता. अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे खरीप पिके आले नाहीत. विहिरींना पाणी नसल्यामुळे रब्बी हंगाम मोठ्या प्रमाणात घटला होता. यावर्षी सरासरीच्या दीडशे टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील केटीवेअर, पाझर तलाव, बंधारे पाण्याने भरले आहेत. नदी-नाले खळखळ वाहत आहेत. त्यामुळे जमिनीत ओल वाढली. पर्यायाने विहिरींना मुबलक पाणी आहे. 

रब्बीसाठी स्वच्छ वातावरण तयार झाले आहे. अतिपावसामुळे लावलेले कांदे व कांद्याचे रोपे नष्ट झाली आहेत. कांदे बियाण्यांचा भाव गगनाला भिडला आहे. कांद्याचे नवीन बियाणे उपलब्ध नसल्यामुळे कांद्याऐवजी गहू, हरभरा लागवडीत वाढ होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रब्बीची लागवड उद्दिष्टापेक्षा जास्त होण्याची शक्‍यता आहे. सर्व जमीन रब्बीखाली येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

यावर्षी दमदार पाऊस झाला आहे. मागील वर्षी पाण्याअभावी रब्बी हंगाम समाधानकारक झाला नाही. यावर्षी मुबलक पाण्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढेल. साधारणतः ३० ते ३५ टक्के क्षेत्र वाढू शकेल. 
- आर. व्ही. पवार, मंडल अधिकारी

रब्बी पीक घेण्यासाठी शेतातील नुकसानग्रस्त मका, बाजरीची आवराआवर युद्धपातळीवर सुरू आहे. रब्बीसाठी जमिनीची मशागत केली जात आहे. गहू, हरभरा या पिकांवर भर राहील.- संजय सूर्यवंशी, शेतकरी


इतर ताज्या घडामोडी
पदोन्नती प्रकरणात ‘पंदेकृवि’ने काढले...अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आजपासून...नगर  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांमध्ये `कोरोना`...पुणे : निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला जेमतेम २८...
केळी पिकवून विकण्यासाठी अखेर...परभणी : ‘लॅाकडाऊन’मुळे केळीच्या दरात मोठी घसरण...
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पाऊस कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी (ता.५) सायंकाळी...
जनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...
अकोल्यात भाजीपाला, फळविक्रीची ११०...अकोला ः सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यातील...
‘वीज दर कपातीत शेतकऱ्यांवरील अन्याय दूर...अकोला ः राज्य वीज नियामक आयोगाने नुकतीच उद्योग,...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात फुले...नांदेड : ‘लॅाकडाऊन’मुळे नांदेडसह अन्य ठिकाणच्या...
फूल विक्रीचा व्यवसाय डबघाईस; फेकून...शिरपूरजैन, जि. वाशीम : येथील फूल उत्पादक शेतकरी...
बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायने...नाशिक : द्राक्षापासून बेदाणा निर्मितीसाठी...
नाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या...नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात...
मराठवाड्यात फळे, भाजीपाल्याची ८१ हजार...औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ...
माळीनगरमध्ये आता नीरापासून गुळ उत्पादन लवंग, जि. सोलापूर : सध्या नीरा उत्पादनाचा हंगाम...
आरोग्य कर्मचाऱ्यासांठी सुरक्षेची पूर्ण...नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयातील ‘कोरोना’...
अमरावती बाजार समितीची ३२ अडत्यांवर...अमरावती ः किरकोळ भाजी विक्री न करण्याचे आदेश...
‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा...मुंबई : ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा,...
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे...सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या...
इस्लामपूरकरांना भाजीपाल्यासह साखरवाटप नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा)...
राज्यातील अतिरिक्त १० लाख लिटर दूध...संगमनेर, जि.नगर : कोरोना विषाणूचा...