Agriculture news in marathi Rabi season hybrid tide saved farmer in Buldana district | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात रब्बीत हायब्रीड ज्वारीने तारले 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

बुलडाणा ः खरिपातील सोयाबीन काढून गहू किंवा हरभऱ्याचे पीक घेणारे शेतकरी असंख्य आहेत. परंतु जिल्ह्यात यावर्षी जानेफळ (ता. मेहकर) परिसरातील शेतकऱ्यांनी संकरित ज्वारीची लागवड केली. या पिकाने शेतकऱ्यांना चांगला हात दिल्याचे शेतकरी सांगत आहेत. गहू, हरभरा या पिकांना एक पर्याय म्हणून शेतकरी संकरित ज्वारी लागवडीकडे आता बघू लागले आहेत. 

बुलडाणा ः खरिपातील सोयाबीन काढून गहू किंवा हरभऱ्याचे पीक घेणारे शेतकरी असंख्य आहेत. परंतु जिल्ह्यात यावर्षी जानेफळ (ता. मेहकर) परिसरातील शेतकऱ्यांनी संकरित ज्वारीची लागवड केली. या पिकाने शेतकऱ्यांना चांगला हात दिल्याचे शेतकरी सांगत आहेत. गहू, हरभरा या पिकांना एक पर्याय म्हणून शेतकरी संकरित ज्वारी लागवडीकडे आता बघू लागले आहेत. 

या भागातील शेतकरी सोयाबीन व तूर अशी पीक पद्धती वर्षानुवर्षे जोपासून आहेत. सोयाबीन काढून काही शेतकरी गहू, हरभऱ्याची लागवड करतात. मात्र, या हंगामापासून रब्बीत संकरित ज्वारीचा प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जानेफळ (ता. मेहकर) भागात अधिक वाढली. या तालुक्यात ३०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली. 

काहींनी सोयाबीन काढणीनंतर गहू, हरभऱ्याऐवजी ज्वारीची लागवड केली होती. त्या पिकाची काढणी अंतिम टप्प्यात पोचली आहे. शेतकऱ्यांना सरासरी २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. तर तुरीचे पीक काढून ज्यांनी हायब्रीड ज्वारीची पेरणी केली त्या शेतकऱ्यांचे पीक या महिन्याच्या अखेरपर्यंत तयार होणार आहे. एप्रिलमध्ये उष्णतेमुळे ज्वारीच्या कणसात दाणे भरतील किंवा नाही याबाबत सुरुवातीला शंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, सध्या कणसांमध्ये भरघोस दाणे भरले आहेत. 

एकरी १५ ते २० क्विंटलदरम्यान सर्रास उतारा येईल, अशी अपेक्षा आहे. दरवर्षी रब्बीत गहू, हरभरा हीच पिके घेतली जातात. पिकबदल नसल्याने किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचा उत्पादनावर परिणाम होऊ लागल्याने अनेकदा शेतकऱ्यांना नुकसान झेलावे लागते, अशा स्थितीत ज्वारीचे पीक फायदेशीर ठरू लागले आहे. 

भाकरीची प्रतिष्ठा वाढली 
ज्वारीचे पीक मागील काही वर्षात कालबाह्य झाले आहे. त्यामुळे चाऱ्याचाही प्रश्‍न बिकट होत गेला. आता मात्र, दैनंदिन आहारात ज्वारीला मागणी वाढली आहे. ‘भाकरी’ला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यामुळे गव्हाच्या तुलनेत ज्वारीचे दर अधिक आहेत. ज्वारीला सरासरी दोन हजार रुपये क्विंटलपेक्षा अधिक दर मिळतो. ज्वारी पिकाला एकरी मिळून सर्व खर्च सात हजारांपर्यंत लागतो. तुलनेने एकरात २० क्विंटल उत्पादन मिळाले व दोन हजारांचा सरळ दर राहल्यास ४० हजारांचे उत्पादन होते. खर्च वजा जाता शेतकऱ्यांना एकरी किमान २५ हजारांपेक्षा अधिक उत्पन्न येत आहे. 

या मोसमात आम्ही पहिल्यांदा हायब्रीड ज्वारीची लागवड केली आहे. पीक कणसे भरण्याच्या स्थितीत आहे. एकरी किमान २० क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. काही शेतकऱ्यांची काढणी झाली असून सरासरी इतकाच उतारा मिळालेला आहे. हरभरा उत्पादक दरवर्षी मर रोगाने त्रस्त झाले आहेत. त्यांच्यासाठी हायब्रीड ज्वारीचा चांगला पर्याय निर्माण झाला. 
- रमेश निकस, जानेफळ, ता. मेहकर जि. बुलडाणा 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...