agriculture news in marathi, Rabi season is likely to increase the area of ​​rearing | Agrowon

रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

जळगाव : खानदेशात यंदा रब्बी हंगामात हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. कमी पाणी व कमी खर्चात येणारे पीक म्हणून हरभऱ्याची ओळख आहे. यंदा पाणी कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांनी अधिक पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी हरभरा पेरणीवर भर देण्याचे ठरविल्याचे चित्र आहे. दसरा सणानंतर ही पेरणी वेगात सुरू होईल, असे चित्र आहे.

जळगाव : खानदेशात यंदा रब्बी हंगामात हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. कमी पाणी व कमी खर्चात येणारे पीक म्हणून हरभऱ्याची ओळख आहे. यंदा पाणी कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांनी अधिक पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी हरभरा पेरणीवर भर देण्याचे ठरविल्याचे चित्र आहे. दसरा सणानंतर ही पेरणी वेगात सुरू होईल, असे चित्र आहे.

उडीद, मुगाचे क्षेत्र रिकामे झाल्यानंतर तापी काठावरील काही गावांमध्ये मका व कांद्याची पेरणी, लागवड झाली. काही शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीसाठी शेत रिकामे ठेवले आहे. सोयाबीन, ज्वारी व बाजरीच्या रिकाम्या शेतात हरभऱ्याची पेरणी होईल. सोयाबीनची मळणी अनेक ठिकाणी सुरू आहे. ती आणखी आठ ते १० दिवस सुरू राहील. त्यानंतर मशागत करून पेरणीचे नियोजन केले जाईल. खानदेशात तापी काठावरील काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू हरभरा अधिक असतो. खानदेशात यंदा सुमारे एक लाख ३५ हजार हेक्‍टरपर्यंत हरभऱ्याचे क्षेत्र राहील, असा अंदाज आहे.

मुक्ताईनगर, रावेर भागात बागायती हरभरा ठिबकच्या साह्याने घेतला जातो. यावल, जळगाव, चोपडा, शहादा भागात कोरडवाहू हरभरा घेतला जातो. अपेक्षित पाऊस झाला नसल्याने एक पाणी देण्याची वेळ येईल, असे सांगितले जात आहे.

शासकीय यंत्रणांनी रब्बीचे नियोजन केले आहे. त्यात पाऊस नसल्याने क्षेत्र वाढेल की नाही, याबाबत शंका आहे. सध्या काही भागात ज्वारी (दादर) पेरणी पेरणी सुरू आहे. जळगाव, चोपडा, अमळनेर, शिंदखेडा भागात दादरचे क्षेत्र बऱ्यापैकी असते. नवरात्रोत्सवात पाऊस हजेरी लावेल, अशी भाबडी आशा शेतकऱ्यांना आहे. पाऊस आल्यास रब्बी पिकांना मोठा लाभ होईल. पेरणीही वाढेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बियाणे उपलब्ध

बाजारात हरभऱ्यासह इतर पिकांचे बियाणे उपलब्ध झाले आहे. महाबीजकडूनही बियाणे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही गतीने सुरू आहे. यंदा सर्व प्रकारचे बियाणे मुबलक असेल. कापसाखालील क्षेत्र रिकामे करून मका लागवड यंदा अधिक होईल. कारण अनेक ठिकाणी कापसाचे पीक हवे तसे नाही. त्यामुळे मक्‍याची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होण्याची शक्‍यता आहे, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

इतर बातम्या
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
पुणे विभागात पाच लाख हेक्टरला पीकविमा...पुणे : नैसर्गिक आपत्ती, किडी आणि रोगांमुळे...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...
नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने...
केडीसीसी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी एक...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना...उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील काही...
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म...अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन...
राज ठाकरे यांची दिवसभर चौकशीमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत...
मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरींसाठी ३७४...पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...