सातारा जिल्ह्यात रब्बी हंगामात ७६ टक्के पेरणी 

Rabi season in the Satara district sowing 5 percent
Rabi season in the Satara district sowing 5 percent

सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी बुधवारअखेर ७६.१४ टक्के क्षेत्रावर झाली आहे. जिल्ह्यात माण तालुक्यात सर्वाधिक ३१ हजार २४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे जोमदार वाढ झालेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १४ हजार ८२३ हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) एक लाख ६३ हजार ५५७ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ७६.१४ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळी माण तालुक्‍यात ३१ हजार २४६ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

रब्बी ज्वारीच्या पेरणीचा कालावधी संपला असल्याने सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी होणार आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३९ हजार ९१२ हेक्‍टर असून, त्यापैकी एक लाख सहा हजार ७५२ हेक्‍टर म्हणजेच ७६.७४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८६३ हेक्‍टर असून, २१ हजार ८११ हेक्‍टर म्हणजेच ७५.५७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार ४७२ हेक्‍टर असून, २५ हजार २५१ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र दहा हजार ९४१ हेक्‍टर असून, आठ हजार ८८६ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण होत असल्याने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. खरिपातील पिकांवरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रब्बी ज्वारीवर मोठ्या प्रमाणात वाढू लागला. काही ठिकाणी ऊस पिकांवर या अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. तसेच गहू पिकांवर तांबेरा तर हरभऱ्यांवर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 

पेरणी झालेले तालुकानिहाय क्षेत्र (हेक्‍टर)  सातारा ः ११,८३१ जावळी ः ६३५४, पाटण ः १५,०१५, कऱ्हाड ः ८९६०, कोरेगाव ः २०,४७९, खटाव ः १३,८६४, माण ः ३१,२४६, फलटण ः २८,२८४, खंडाळा ः १४,२५३, वाई ः १२,६२३, महाबळेश्वर ः ६४८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com