agriculture news in Marathi rabi seed available in eight district Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी बियाणे उपलब्ध

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने उत्पादित केलेले रब्बी पिकांचे बियाणे त्या त्या भागातील शेतकऱ्यांना खरेदी करता यावे यासाठी विभागातील सर्व आठ जिल्ह्यांमधील विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र, संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी एकाच ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी होते. हे टाळण्यासाठी यंदा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने उत्पादित केलेले रब्बी पिकांचे बियाणे त्या त्या भागातील शेतकऱ्यांना खरेदी करता यावे यासाठी मराठवाडा विभागातील सर्व आठ जिल्ह्यांमधील विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र, संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित विविध रब्बी पिकांच्या बियाणे विक्रीचा प्रारंभ दरवर्षी मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनी १७ सप्टेंबर रोजी आयोजित रब्बी पीक शेतकरी मेळाव्यामध्ये होत असतो. परंतु यंदा कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदाचा रब्बी शेतकरी मेळावा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला. पूर्वी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना विद्यापीठाने उत्पादित केलेले हरभरा, करडई, गहू, जवस, सूर्यफूल, रब्बी ज्‍वारी आदी पिकांच्‍या विविध वाणांच्या बियाण्याची खरेदीची सुविधा केवळ परभणी येथील मुख्‍यालयी ठेवली जात असे. 

शेतकरी रांगा लावून बियाणे खरेदी करतात. परंतु कुलगुरू डॉ. अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर यांच्या संकल्पनेतून यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागातील प्रत्‍येक जिल्ह्यातील विद्यापीठांतर्गतची कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय आदी ठिकाणी करण्‍यात येणार आहे.

कृषी विद्यापीठातील परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्र तसेच विद्यापीठ अंतर्गतचे औरंगाबाद, बदनापुर (जि.जालना), खामगांव (जि.बीड), तुळजापुर (जि.उस्‍मानाबाद) येथील कृषी विज्ञान केंद्रे तसेच लातूर येथील गळीत धान्‍य संशोधन केंद्र, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, गोळेगांव(जि.हिंगोली) येथील कृषी महाविद्यालय या ठिकाणी बियाणे विक्रीसाठी उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहे. शेतकऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन बियाणे खरेदी करावे असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

पीकनिहाय बियाणे दर

पीक   वाण दर प्रतिकिलो  प्रतिबॅग 
वजन (किलो)
प्रतिबॅगचे 
दर 
हरभरा   बीडिएनजी-७९७ (आकाश)  ७५ रुपये   १०   ७५० रुपये
हरभरा  बीडिएनजीके-७९८  १०० रुपये   १०    १००० रुपये
करडई पीबीएनएस-१२ (परभणी कुसुम) ९० रुपये  ५     ४५० रुपये
करडई   पीबीएनएस-८६ (पूर्णा)   ९० रुपये  ५   ४५० रुपये
ज्वारी  एसपीव्ही-१४११ (परभणी मोती)   ७० रुपये    ४   २८० रुपये
ज्वारी   सीएसव्ही-१८ (परभणी ज्योती)  ७० रुपये    ४    २८० रुपये
ज्वारी   एसपिव्ही-२४०७ (सुपर मोती)  ७० रुपये   ४   २८० रुपये
जवस  एलएसएल -९३  ८० रुपये   ५   ४०० रुपये
सूर्यफूल   एलएसएफएच-१७१   ३५० रुपये  २   ७०० रुपये

इतर अॅग्रो विशेष
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...
शाश्‍वत पर्यायी पीक ः बांबूनिसर्ग चक्र बदलत चालले आहे. आतापर्यंत आपण रेल्वे...
‘जीआय’चे अधिकृत ब्रॅंडींगकोविड महामारीनंतर जागतिक बाजारातही खूप उलटफेर...
अमळनेरच्या भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून...अमळनेर, जि.जळगाव ः येथील मासळी बाजारानजीकच्या...
लाच घेताना कृषी विद्यापीठातील लिपिकाला...नगर : कोरोना पुणे सेवानिवृत्तीची कागदपत्रे...
राज्यात पीक नुकसान ५० लाख हेक्टरच्या...पुणे: राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा...
जुन्या निकषांनुसार कामाला विमा...जळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
किती अन् काय सांगावं...हात टेकलेत आमचेजालना : कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या...