Rabi sowing on 12% area in Satara
Rabi sowing on 12% area in Satara

साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर पेरणी

जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने रब्बी हंगामातील पेरणीची कामे उघडीप दिल्याने रब्बी पेरणीच्या कामांना काही प्रमाणात ब्रेक लागला होता. शेतात घात येईल तसतशी पेरणीच्या कामांना वेग येऊ लागला आहे. जिल्ह्यात १२.५४ टक्के क्षेत्रावर पेरणी बुधवारअखेर (ता. २१) झाली आहे.

सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने रब्बी हंगामातील पेरणीची कामे उघडीप दिल्याने रब्बी पेरणीच्या कामांना काही प्रमाणात ब्रेक लागला होता. शेतात घात येईल तसतशी पेरणीच्या कामांना वेग येऊ लागला आहे. जिल्ह्यात १२.५४ टक्के क्षेत्रावर पेरणी बुधवारअखेर (ता. २१) झाली आहे.

जिल्ह्यात सुरू असलेल्या पाऊस लांबल्याने रब्बी हंगामाचा कालावधी वाया गेला आहे. प्रामुख्याने रब्बी ज्वारी कालावधी पुढे गेला असल्याने रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. तसेच पावसामुळे खरीप पिके काढण्यास विलंब झाला असल्याने शेत जमिनीस घात येईल, तशी रब्बीसाठी शेत तयार करणे व मशागत झालेल्या शेतात पेरणीच्या कामात शेतकरी कामात व्यस्त झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १९ हजार ११९ हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) २७ हजार ४७३ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच १२.५४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

माण, खटाव, कोरेगाव, फलटण व खंडाळा या दुष्काळग्रस्त तालुक्यांचा रब्बी हा प्रमुख हंगाम असतो. मात्र, या तालुक्यांत वादळी पाऊस जास्त झाला असल्याने हंगाम सुरू होऊनही पेरणीची कामे उशिरा सुरू झाली आहेत. जिल्ह्यात माण तालुक्‍यात सर्वाधिक १४ हजार २७० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३२ हजार २०० हेक्‍टर असून, त्यापैकी २४ हजार ९३२ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४९८ हेक्‍टर असून, त्यापैकी एक हजार ४७ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १२ हजार १७७ हेक्‍टर असून, एक हजार १४४ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या दृष्टीने खते, बियाणे उपलब्ध करण्यात आली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com