agriculture news in Marathi rabi sowing up by 12 percent Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यात रब्बीच्या क्षेत्रात बारा टक्क्याने वाढ

सुर्यकांत नेटके
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

 राज्यात यंदा रब्बीचे क्षेत्र सरासरीच्या पुढे गेले आहे. मात्र गेल्यावर्षीपेक्षा यंदा १२ टक्के अधिक पेरणी झाली. गेल्यावर्षी ५७ लाख ६४ हजार ०५६ हेक्टरवर एकूण पेरणी झाली होती. 

नगर : राज्यात यंदा रब्बीचे क्षेत्र सरासरीच्या पुढे गेले आहे. मात्र गेल्यावर्षीपेक्षा यंदा १२ टक्के अधिक पेरणी झाली.  गेल्यावर्षी ५७ लाख ६४ हजार ०५६ हेक्टरवर एकूण पेरणी झाली होती. यंदा ५७ लाख ८२ हजार हेक्टरवर १२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीचे क्षेत्र सरासरीपेक्षा २० टक्क्यांनी घटले आहे. गेल्यावर्षी ज्वारी ८६.५३ टक्क्यावर पेरली गेली होती. यंदा ज्वारीची ८०.६३ टक्के पेरणी झाली आहे. 

राज्यातील बहुतांश भागात यंदा परतीच्या पावसाच्या वेळी सलग बऱ्याच काळ पाऊस झाल्याने ज्वारीची वेळेत पेरणी करता आली नाही. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र घटले, नगर, मराठवाडा, सोलापुर भागात ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र असते. ज्वारीच्या जागी हरभरा, गहू, मक्याची पेरणी झाली आहे. कडधान्याची गेल्यावर्षीपेक्षा ११४ टक्के पेरणी झाली आहे. तेलबियांत यंदा पन्नास टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 

दृष्टीक्षेपात राज्यातील रब्बीची स्थिती  

  • गव्हाचे सरासरी ८ लाख ७५ हजार ६३३ हेक्टर क्षेत्र असून यंदा ११ लाख ९७ हजार हेक्टरवर म्हणजे ३४ टक्के अधिक पेरणी झाली आहे.  गतवर्षीच्या तुलनेत गव्हाचे ३६ हजार हेक्टर क्षेत्र वाढले
  • ज्वारीचे २० लाख २७ हजार २५८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा १६ लाख ३४ हजार ६२६ म्हणजे ८०.६३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. गेल्यावर्षी १८ लाख ८८ हजार ९९५ हेक्टरवर पेरणी झाली होती. 
  • हरभऱ्याचे १७ लाख ४३ हजार २५९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा २४ लाख ८० हजार ५४९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या सुमारे सात लाख हेक्टर तर गतवर्षीपेक्षा दोन लाख हेक्टर क्षेत्राने वाढ झाली आहे. 
  • मक्याचे २ लाख ६३ हजार ८९६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा २ लाख ८३ हजार ५२६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा वीस हजार हेक्टर क्षेत्र वाढले आहे. 
  • तेलबियांचे ८९ हजार २२७ हेक्टर सरासरी क्षेत्र असले तरी यंदा ४४ हजार ९२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा सव्वा चार हजार हेक्टर क्षेत्र वाढले असले तरी राज्याच्या तुलनेत कडधान्याचे क्षेत्र अत्यंत अल्प आहे. 
  • कडधान्याची १८ लाख ४८ हजार ९३३ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्यावर्षी २३ लाख ९० हजार २०७ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा त्यात ९ टक्क्यांनी वाढ होऊन २६ लाख ५३७६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कडधान्याच्या क्षेत्रात यंदा सरासरीच्या तुलनेत सुमारे आठ लाख हेक्टरने वाढ झाली आहे.

इतर अॅग्रो विशेष
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारांनी...पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्य...
सोयाबीन बियाणे वाहतुकीसाठी अट पुणे : सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी वाहतूक...
काळ्या गव्हाच्या लागवडीची...नाशिक : काळ्या गव्हामध्ये पौष्टिकता, औषधी गुणधर्म...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
विदर्भात आज पावसाची शक्यता पुणे : मागील आठ दिवसांपासून वादळी पावसाने अनेक...
आवारात गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी...पुणे : ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत कोरोना...
पुणे बाजार समिती शनिवार-रविवार बंद; इतर...पुणे : पुणे बाजार समिती सोमवार ते शुक्रवार...
मराठवाड्यात ‘पूर्वमोसमी’चे दणके सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
विक्रीपूर्वी सोयाबीन चाचणीवर...अकोला ः राज्यात या हंगामात सोयाबीन बियाणे विक्री...
‘आत्मा’अंतर्गत शेतकरी समित्यांची...अकोला ः राज्यात कृषी विस्तारविषयक सुधारणांसाठी...
तासगाव पश्‍चिम भागात द्राक्ष खरड...सांगली ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात...
खत उद्योगाचे सावध नियोजन पुणे  : गेल्या हंगामातील पहिल्या...
राज्यात पूर्वमोसमी, गारपिटीने पिकांचे...पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात तुरळक...
सांगलीत बेदाणा सौदे बंद सांगली ः लॉकडाउनमध्ये शेतीमालाची खरेदी-विक्री...
विदर्भात पूर्वमोसमीचा जोर राहणारपुणे : राज्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाने...
उन्हाळा, रमजानमुळे टरबुजाला मागणीअकोला : उन्हाचा तडाखा वाढत चालला असल्याने...
व्यावसायिक दृष्टिकोनातून घडवली...नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक...
गाजराने दिले उत्पन्नासह चाराहीनगर जिल्ह्यात अकोल तालुक्यातील गणोरे येथील...
‘गोल्डनबीन’ला झळाळीविदर्भातील अकोला, वाशीमसह मराठवाड्यातील लातूर...
बाबासाहेबांच्या सत्याग्रहाचे शास्त्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रत्येक लढा...