जनावरांच्या शरीरावरील गोचिड निर्मुलन करण्यासाठी ग्रामीण पातळीवर सहज उपलब्ध होईल, अशा औषधी
ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात दोन लाख ७० हजार हेक्टरवर रब्बी पेरणी
नांदेड : जिल्ह्यात रब्बीमध्ये दोन लाख सत्तर हजार हेक्टरवर रब्बीची अंतिम पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक दोन लाख सात हजार ३०५ हेक्टरवर हरभरा, २७ हजार ८२५ हेक्टरवर ज्वारी, तर २५ हजार २२७ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली.
नांदेड : जिल्ह्यात रब्बीमध्ये दोन लाख सत्तर हजार हेक्टरवर रब्बीची अंतिम पेरणी झाली आहे. यात
सर्वाधिक दोन लाख सात हजार ३०५ हेक्टरवर हरभरा, २७ हजार ८२५ हेक्टरवर ज्वारी, तर २५ हजार २२७ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली, अशी माहिती कृषी विभागाकडून मिळाली.
जिल्ह्यात यंदा परतीच्या झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी पेरणी अधिक क्षेत्रावर होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त करून वाढीव क्षेत्राबाबत नियोजन केले. यात बियाणे तसेच खताच्या उपलब्धतेबद्दल नियोजन
करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी दिल्या होत्या.
शेतकऱ्यांनी यंदा जमितीन ओलावा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हरभऱ्याच्या पेरणीला प्राधान्य दिले होते. हरभऱ्याचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ८८ हजार ३५ हेक्टर आहे. मात्र, आजपर्यंत दोन लाख सात हजार ३०५
हेक्टरवर पेरणी झाली.
यासोबतच गव्हाचे पेरणीक्षेत्र १८ हजार ४६३ हेक्टर, तर २५ हजार २२७ हेक्टरवर पेरणी, ज्वारीचे पेरणीक्षेत्र २६ हजार ९५१ हेक्टर, पेरणी २७ हजार ८२५ हेक्टरवर झाली आहे. सध्या जिल्ह्यातील रब्बीची पेरणी १९७. ६३ टक्क्यांनुसार दोन लाख ७० हजार ६३ हेक्टरवर पोचली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगितले.
पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
हरभरा ः दोन लाख ७ हजार ३०५, गहू ः २५ हजार २२७, रब्बी ज्वारी ः २७ हजार ८२५, रब्बी मका ः तीन हजार ७८५, करडई ः दोन हजार ७३७. एकूण दोन लाख ७० हजार ६३ हेक्टरवर पेरणी झाली.
गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिले. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणी अधिक झाली. शेतकऱ्यांनी यंदा हरभरा पेरणीला प्राधान्य दिले आहे.
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.
- 1 of 1055
- ››