देशभरात ४१४ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी

पेरणी
पेरणी

नवी दिल्ली ः देशात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती असल्याने रब्बी पेरणी यंदा कमी झाली आहे. देशात आतापर्यंत ४१४ लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात झालेल्या पेरणीच्या तुलनेत यंदा क्षेत्र ६.२ टक्क्यांनी घटले आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या पेरणी अहवालातून मिळाली आहे.  देशात जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या काळात पाऊस कमी झाला. त्यातच परतीच्या पावसानेही आवश्‍यक तेवढी हजेरी लावली नाही. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी आवश्‍यक ओलावा शिल्लक नसल्याने पेरणी माघारली आहे. मॉन्सूनच्या काळात देशात सरासरीच्या ९ टक्के कमी पाऊस झाला होता. तसेच धरणांमध्येही यंदा कमी पाणीसाठा झाला. केंद्रीय जल आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार सध्या देशातील महत्त्वाच्या ९१ जलाशयांमध्ये ५९ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा दोन टक्यांनी कमी आहे. धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने रब्बी पेरणीसाठी कमी पाणी उपलब्ध होत आहे त्याचा परिणाम पेरणी कमी होण्यावर झाला.  धरणांमधून कमी पाणी उपलब्ध होत असल्याने त्याचा परिणाम पेरणीवर झाला आहे. देशात गव्हाच्या पेरणीत यंदा १.९ टक्क्यांनी वाढ झाली आङे.आतापर्यंत देशात १९४.५ लाख हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. तर रब्बी कडधान्य, भरडधान्य आणि तेलबियांखालील क्षेत्र कमी झाले आहे. महाराष्ट्र हे रब्बीचे एक महत्वाचे राज्य आहे. महाराष्ट्रात दुष्काळ असल्याने यंदा रब्बी पेरणी अत्यंत कमी झाली आहे. पहिल्या सुधारित अंदाजात केंद्राने खरीप हंगामात देशात विक्रमी १४१.५९ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी १४०.७३ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. रब्बी हंगामात केंद्राने १४२.५० दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील वर्षीच्या रब्बी हंगामात १४४.१० दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन झाले होते. भरडधान्यात मोठी घट गेल्या वर्षीच्या तुलनेत रब्बी तेलबियांची पेरणी यंदा १०.३ टक्क्यांनी घटली आहे. आतापर्यंत रब्बी कडधान्य पेरणी ११३.७ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. भरडधान्याच्या पेरणीत मोठी घट झाली असून केवळ ३३.१ लाख हेक्टरवर भरडधान्याचा पेरा झाला आहे. मागील वर्षी याचा काळात झालेल्या पेरणी क्षेत्रात यंदा तब्बल २५.८ टक्के घट झाली आहे. तर रब्बी तेलबियांची पेरणीही यंदा काहीशी घटली आहे. आतापर्यंत तेलबियांची पेरणी ६५.५ लाख हेक्टरवर झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २.८ टक्क्यांनी तेलबियांची पेरणी घटली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com