पुणे विभागात रब्बी पेरणीला सुरुवात

पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत सरासरीच्या १४ लाख ४९ हजार ७ हेक्टरपैकी ४९ हजार ३०५ हेक्टर म्हणजेच सरासरी ३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
Rabi sowing begins in Pune division
Rabi sowing begins in Pune division

पुणे ः पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत सरासरीच्या १४ लाख ४९ हजार ७ हेक्टरपैकी ४९ हजार ३०५ हेक्टर म्हणजेच सरासरी ३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

यंदा वेळेवर दाखल झालेल्या पावसाने खरिपाच्या पेरण्याही वेळेवर सुरू झाल्या होत्या. त्यातच ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोर ओसरल्याने रब्बी हंगामातील पेरण्यांची सुरुवात झाली आहे. विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, तीळ, जवस या पिकांच्या पेरण्या काही प्रमाणात झाल्या असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे. आता पावसानेही काही प्रमाणात उघडीप दिल्याने रब्बी पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा या पेरण्यांना वेगाने सुरुवात होण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यात खरीप हंगामातील भात पिके फुटवे ते निसवण्याच्या अवस्थेत आहे. बाजरी पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. मूग व उडीद पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. तूर पीक शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीन पिकांची काढणी अंतिम टप्यात आली आहे. भुईमूग पीक शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहेत. कापूस पीक फुले ते बोंड लागण्याच्या अवस्थेत आहेत. रब्बी हंगामातील ज्वारी पिकाच्या पेरणीस सुरुवात झाली असून रब्बी ज्वारीची २६ हजार ९४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. इतर पिकांच्या पेरणीस काही तालुक्यामध्ये सुरुवात झाली आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील भात पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे. बाजरी पिकांची काढणी अंतिम टप्यात आहे. भुईमूग पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. मका पीक काढणीच्या व कांदा पीक वाढीच्या अवस्थेत आहे. सोलापूरमध्ये तूर पीक फुलोऱ्यांत आहे. सोयाबीन पीक पक्वतेच्या अवस्थेत असून काढणी सुरू झाली आहे.

बाजरी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून पिकांची वाढ चांगली आहे. काही ठिकाणी बाजरीची काढणी सुरू आहे. सूर्यफूल पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून पिकांची काढणी सुरू आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पिकांच्या पेरणीस सुरुवात केली आहे. तर हरभरा, करडई, सूर्यफूल व मका पिकांच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com