Agriculture news in marathi, Rabi sowing is estimated at three lakh hectares in Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचा अंदाज
टीम अॅग्रोवन
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांत चांगली हजेरी लावली. यामुळे जमिनीत ओलावा राहिला आहे. परिणामी रब्बी पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे तीन लाख हेक्टरपर्यंत रब्बी पेरणी होईल अशी शक्यता गृहीत धरत सुमारे २९ हजार ४०० क्विंटल बियाण्यांची तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांत चांगली हजेरी लावली. यामुळे जमिनीत ओलावा राहिला आहे. परिणामी रब्बी पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे तीन लाख हेक्टरपर्यंत रब्बी पेरणी होईल अशी शक्यता गृहीत धरत सुमारे २९ हजार ४०० क्विंटल बियाण्यांची तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

जिल्ह्याच्या अनेक भागांत सुरवातीपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांमध्ये मुबलक साठा झाला आहे. रब्बी पिकांसाठी ही महत्त्वाची बाब आहे. रब्बी हंगामातील पिके चांगल्या प्रमाणात हाती येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र तीन लाख ९७ हजार ५०५ हेक्टर आहे. त्यात सर्वाधिक एक लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र रब्बी ज्वारीचे आहे.

त्यापाठोपाठ गव्हाचे ४८ हजार तर हरभऱ्याचे ४८ हजार १७० हेक्टर क्षेत्र आहे. गतवर्षी रब्बी हंगामात जिल्ह्यात दोन लाख ७२ हजार ४९६ हेक्टरवर पेरणी झाली होती, तर सुमारे १९ हजार ५७६ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. त्यादृष्टीने बियाण्यांचा मुबलक पुरवठा शेतकऱ्यांना होईल, असे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये महाबीजकडून सुमारे ११ हजार ६५२ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

खासगी कंपन्यांकडून १३ हजार ४९७ क्विंटल तर उर्वरित बियाण्यांचा पुरवठा राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून (एनएससी) करण्यात येणार आहे. युरियासह रब्बी हंगामासाठी सुमारे दोन लाख २ हजार ३२० टन खतांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...