Agriculture news in marathi Rabi sowing in Marathwada does not get speed | Agrowon

मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

 लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती अजूनही संथच असल्याची स्थिती आहे. आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास १८ टक्‍के क्षेत्रावरीलच पेरणी उरकल्याचे चित्र आहे. हातचा गेलेला खरीप, अतिपावसामुळे वाफश्‍यावर न आलेल्या जमिनी, जमीन तयार करण्यासाठी लागलेला वेळ, काही ठिकाणी करावी लागलेली दुबार पेरणी, बियाणे व खतांसाठी नसलेला पैसा आदी कारणामुंळे रब्बी पेरणीस विलंब होत आहे.  

 लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती अजूनही संथच असल्याची स्थिती आहे. आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत जवळपास १८ टक्‍के क्षेत्रावरीलच पेरणी उरकल्याचे चित्र आहे. हातचा गेलेला खरीप, अतिपावसामुळे वाफश्‍यावर न आलेल्या जमिनी, जमीन तयार करण्यासाठी लागलेला वेळ, काही ठिकाणी करावी लागलेली दुबार पेरणी, बियाणे व खतांसाठी नसलेला पैसा आदी कारणामुंळे रब्बी पेरणीस विलंब होत आहे.  

मराठवाड्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र जवळपास १९ लाख हेक्‍टर आहे. त्या तुलनेत गत आठवडाअखेपर्यंत आठही जिल्ह्यांत १ लाख ४५ हजार ३३१ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली. जिल्ह्यात पेरणीची गती जास्त, तर नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत कमी असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ८ हजार १८८ हेक्‍टर होते. त्या तुलनेत १६ हजार ९५५ हेक्‍टरवर अर्थात केवळ ८.१४ टक्‍के क्षेत्रावरच पेरणी झाली. 

जालना जिल्ह्यात सर्वसाधारण १ लाख ७४ हजार ३६८ हेक्‍टरच्या तुलनेत ३० हजार ३७७ हेक्‍टर अर्थात १७.४२ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली. बीड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख २२ हजार ७३० हेक्‍टर आहे. तरीही ९७ हजार ३० हेक्‍टरवर अर्थात २२.९५ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लातूर जिल्ह्यात सर्वसाधारण १ लाख ९५ हजार १६३ हेक्‍टरच्या तुलनेत ३९ हजार ६६१ हेक्‍टरवर पेरणी झाली.

उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण ३ लाख ३१ हजार ४९६ हेक्‍टरच्या तुलनेत ४७ हजार ३३७ हेक्‍टरवर, परभणी जिल्ह्यात सर्वसाधारण ३ लाख १ हजार ४३१ हेक्‍टरच्या तुलनेत ९ हजार ९७१ हेक्‍टरवर, तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नसल्याची स्थिती आहे.


इतर ताज्या घडामोडी
'तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ व्हावे...गेल्या पाच-दहा वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी...
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...