सातारा जिल्ह्यात रब्बी पेरणी अंतिम टप्प्यात

सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. जिल्ह्यात ८७.९३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
Rabi sowing in Satara district in final stage
Rabi sowing in Satara district in final stage

सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. जिल्ह्यात ८७.९३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी ज्वारीची झाली आहे. कांद्याचे दर समाधानकारक आहेत. त्यामुळे कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.  

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. हरभरा आणि गहू पिकांची कामेही उरकत आली आहेत. रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १९ हजार ११९ हेक्‍टर आहे. त्यापैकी (ऊस वगळून) एक लाख ९२ हजार ६७५ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ८७.९३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.  

रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३२ हजार २०० हेक्‍टर आहे. त्यापैकी एक लाख २६ हजार ८०५ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४९८ हेक्‍टर आहे. त्यापैकी २५ हजार २०२ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १२ हजार १७७ हेक्‍टर आहे. त्यापैकी दहा हजार २३६ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. 

गव्हाचे ३४ हजार ९७३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापैकी २९ हजार ४४३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दुष्काळी तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढली आहे. यामुळे पश्चिम भागासह दुष्काळी तालुक्यातही ऊस लागवड सुरू आहे. कांद्याचे दर सध्या समाधानकारक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र वाढणार आहे. कांदा बियाणे व कांद्याच्या तरावाचे दर वाढले असले तरी शेतकऱ्यांकडून कांदा लागवड केली जात आहे.  

तालुकानिहाय रब्बी पेरणी (हेक्टरमध्ये) 

सातारा १७२९३, जावली ७३३४, पाटण १०७१०, कराड १३०२५, कोरेगाव २११९७, खटाव २७०००, माण ३९५०५०, फलटण २५२७२, खंडाळा १६५५७, वाई १४३४९, महाबळेश्वर ४३३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com