रब्बी पेरणीपूर्वी जल, मृद संधारण

सपाट जमिनीवर पेरणी पूर्व बांधणी करण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी सारा यंत्राने सारे पाडून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकावा. साधारणपणे १० × १० किंवा १० × १२ चौरस मीटर आकाराचे वाफे तयार करावेत.
sowing by broad bed furrow method
sowing by broad bed furrow method

सपाट जमिनीवर पेरणी पूर्व बांधणी करण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी सारा यंत्राने सारे पाडून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकावा. साधारणपणे १० × १० किंवा १० × १२ चौरस मीटर आकाराचे वाफे तयार करावेत. रब्बी हंगामातील कोरडवाहू पिकांची पेरणी ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होते. या या पिकांची पूर्ण वाढ जमिनीतील ओलीवर होते. पावसाच्या परतीच्या कालावधीमध्ये मृदा व जलसंधारणच्या विविध पद्धतींचा वापर करून मूलस्थानी जलसंधारण करावे.जमिनीत पाणी अधिक मुरुवून धारण क्षमता वाढवणे गरजेचे आहे. असे केल्यास पीक उत्पादन वाढीसाठी फायदा होईल. बद्ध वरंबा पद्धत

  • सरी वरंबा मधील एक आधुनिक पद्धत म्हणून बद्ध वरंबा पद्धत ओळखली जाते. या पद्धतीने अवकाळी पावसाचे पाणी सरीमध्ये साठवून ठेवले जाते. पिकांच्या मुळापर्यंत ते मुरवले जाते.
  • या पद्धतीचा फायदा फक्त पावसाचे पाणी साठवण्यासाठी नाही तर अतिपावसामुळे जमिनीच्या अन्नद्रव्यांचा मुख्यतः नत्राचा होणारा ऱ्हास कमी होऊन पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होतो.
  • उताराला आडवी नांगरणी

  • जे शेतकरी फक्त रब्बी ज्वारी लागवड करतात, त्यांनी खरीप हंगामात रिकाम्या शेतात खोलवर नांगरणी करावी. शेताला उतार असेल तर उताराला आडवी नांगरणी करावी.
  • ज्यांनी खरिपात मूग, उडीद लागवड केली होती, त्यांनी पीक काढणीनंतर त्या पिकांच्या अवशेषांसह खोलवर नांगरणी करावी. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारेल. पावसाचे पाणी उताराला अडवले जाईल. पाणी जमिनीत खोलवर मुरण्यास मदत होईल.
  • सपाट जमिनीवर पेरणी पूर्व बांधणी करण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी सारा यंत्राने सारे पाडून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकावा. साधारणपणे १० × १० किंवा १० × १२ चौरस मीटर आकाराचे वाफे तयार करून घ्यावेत. जेणेकरून पावसाचे पाणी वाफ्यांमध्ये मुरून जमिनीत ओलावा वाढेल. पिकाच्या उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्यास मदत होईल.
  • कंपार्टमेंट बंडींग 

  • साधारणतः हलकी ते भारी, ०.५ ते १ टक्यांपर्यंत उतार असलेल्या शेतजमिनीवर पावसाचे पाणी मुरवण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात येतो.
  • या पद्धतीमुळे जमिनीचा ओलावा वाढतो. धूप कमी होते.
  • ही पद्धत ज्वारी, मका, सूर्यफूल उत्पादन वाढण्यास फायदेशीर ठरते.
  • रुंद वरंबा पद्धत 

  •  ही पद्धत भारी जमीन, वार्षिक सरासरी पाऊस ७५० पेक्षा अधिक असलेल्या भागात वापरली जाते.
  • बैल किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने ९० ते १२० सें मी. रुंद, १५ सें मी. उंच आकाराचे वाफे तयार करून घ्यावेत. दोन वाफ्यातील अंतर ६० सेंमी. ठेऊन १५ सेंमी. खोलीची सरी पाडून घ्यावी. जेणेकरून जमीन आणि पाण्याची धूप कमी होईल. पाणी जमिनीत जास्त मुरण्यास मदत झाल्यामुळे उत्पादनात वाढ होईल.
  • या पद्धतीमुळे मका, करडई, गहू उत्पादन वाढते.
  • आच्छादनाचा वापर : जमिनीतून ६० ते ७० टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे नाहीसा होतो. हा ओलावा टिकवण्यासाठी शेतातून काढलेले तण,अगोदरच्या पिकांचे अवशेषांचा. वापर आच्छादनासाठी करावा. आच्छादन ज्वारी पेरणी नंतर ८ आठवड्याच्या आत केल्यास उत्पादनात १४ टक्यांपर्यंत वाढ होते. संपर्क - रविराज नलावडे, ८६०५९६७५२८ (रत्नाई कृषि महाविद्यालय, अकलूज,जि.सोलापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com