agriculture news in marathi before rabi sowing, soil and Water conservation | Page 2 ||| Agrowon

रब्बी पेरणीपूर्वी जल, मृद संधारण

रविराज नलावडे, धनाजी सावंत
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

सपाट जमिनीवर पेरणी पूर्व बांधणी करण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी सारा यंत्राने सारे पाडून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकावा. साधारणपणे १० × १० किंवा १० × १२ चौरस मीटर आकाराचे वाफे तयार करावेत.
 

सपाट जमिनीवर पेरणी पूर्व बांधणी करण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी सारा यंत्राने सारे पाडून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकावा. साधारणपणे १० × १० किंवा १० × १२ चौरस मीटर आकाराचे वाफे तयार करावेत.

रब्बी हंगामातील कोरडवाहू पिकांची पेरणी ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होते. या या पिकांची पूर्ण वाढ जमिनीतील ओलीवर होते. पावसाच्या परतीच्या कालावधीमध्ये मृदा व जलसंधारणच्या विविध पद्धतींचा वापर करून मूलस्थानी जलसंधारण करावे.जमिनीत पाणी अधिक मुरुवून धारण क्षमता वाढवणे गरजेचे आहे. असे केल्यास पीक उत्पादन वाढीसाठी फायदा होईल.

बद्ध वरंबा पद्धत

 • सरी वरंबा मधील एक आधुनिक पद्धत म्हणून बद्ध वरंबा पद्धत ओळखली जाते. या पद्धतीने अवकाळी पावसाचे पाणी सरीमध्ये साठवून ठेवले जाते. पिकांच्या मुळापर्यंत ते मुरवले जाते.
 • या पद्धतीचा फायदा फक्त पावसाचे पाणी साठवण्यासाठी नाही तर अतिपावसामुळे जमिनीच्या अन्नद्रव्यांचा मुख्यतः नत्राचा होणारा ऱ्हास कमी होऊन पिकाच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होतो.

उताराला आडवी नांगरणी

 • जे शेतकरी फक्त रब्बी ज्वारी लागवड करतात, त्यांनी खरीप हंगामात रिकाम्या शेतात खोलवर नांगरणी करावी. शेताला उतार असेल तर उताराला आडवी नांगरणी करावी.
 • ज्यांनी खरिपात मूग, उडीद लागवड केली होती, त्यांनी पीक काढणीनंतर त्या पिकांच्या अवशेषांसह खोलवर नांगरणी करावी. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारेल. पावसाचे पाणी उताराला अडवले जाईल. पाणी जमिनीत खोलवर मुरण्यास मदत होईल.
 • सपाट जमिनीवर पेरणी पूर्व बांधणी करण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी सारा यंत्राने सारे पाडून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकावा. साधारणपणे १० × १० किंवा १० × १२ चौरस मीटर आकाराचे वाफे तयार करून घ्यावेत. जेणेकरून पावसाचे पाणी वाफ्यांमध्ये मुरून जमिनीत ओलावा वाढेल. पिकाच्या उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्यास मदत होईल.

कंपार्टमेंट बंडींग 

 • साधारणतः हलकी ते भारी, ०.५ ते १ टक्यांपर्यंत उतार असलेल्या शेतजमिनीवर पावसाचे पाणी मुरवण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात येतो.
 • या पद्धतीमुळे जमिनीचा ओलावा वाढतो. धूप कमी होते.
 • ही पद्धत ज्वारी, मका, सूर्यफूल उत्पादन वाढण्यास फायदेशीर ठरते.

रुंद वरंबा पद्धत 

 •  ही पद्धत भारी जमीन, वार्षिक सरासरी पाऊस ७५० पेक्षा अधिक असलेल्या भागात वापरली जाते.
 • बैल किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने ९० ते १२० सें मी. रुंद, १५ सें मी. उंच आकाराचे वाफे तयार करून घ्यावेत. दोन वाफ्यातील अंतर ६० सेंमी. ठेऊन १५ सेंमी. खोलीची सरी पाडून घ्यावी. जेणेकरून जमीन आणि पाण्याची धूप कमी होईल. पाणी जमिनीत जास्त मुरण्यास मदत झाल्यामुळे उत्पादनात वाढ होईल.
 • या पद्धतीमुळे मका, करडई, गहू उत्पादन वाढते.

आच्छादनाचा वापर :
जमिनीतून ६० ते ७० टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे नाहीसा होतो. हा ओलावा टिकवण्यासाठी शेतातून काढलेले तण,अगोदरच्या पिकांचे अवशेषांचा. वापर आच्छादनासाठी करावा. आच्छादन ज्वारी पेरणी नंतर ८ आठवड्याच्या आत केल्यास उत्पादनात १४ टक्यांपर्यंत वाढ होते.

संपर्क - रविराज नलावडे, ८६०५९६७५२८
(रत्नाई कृषि महाविद्यालय, अकलूज,जि.सोलापूर)


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक...तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीची अन्य पर्यायी नावे...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...