Agriculture news in marathi Rabi sowing started in Nanded district | Page 2 ||| Agrowon

नांदेड जिल्ह्यात रब्बीची पेरणी सुरु

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021

नांदेड : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडी जाणवू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीला सुरवात केली आहे. सध्या हरभरा, करडई, रब्बी ज्वारी आदी पिकांची पेरणी होत आहे. पाटबंधारे विभागाने अद्याप पाणी पाळ्यांचे नियोजन जाहीर केले नाही. यामुळे गहू पेरणीला दिवाळीनंतर सुरवात होण्याची शक्यता आहे. 

नांदेड : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडी जाणवू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीला सुरवात केली आहे. सध्या हरभरा, करडई, रब्बी ज्वारी आदी पिकांची पेरणी होत आहे. पाटबंधारे विभागाने अद्याप पाणी पाळ्यांचे नियोजन जाहीर केले नाही. यामुळे गहू पेरणीला दिवाळीनंतर सुरवात होण्याची शक्यता आहे. 

नांदेड जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रब्बीमध्ये साडेतीन हजार हेक्टरवर पेरणीची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. यात सर्वाधिक अडीच लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा होईल, असा अंदाज आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात थंडीला सुरवात झाली आहे. यामुळे शेतकरी सोयाबीन पिकाची काढणी झालेल्या शेतात मशागत करून हरभरा, करडई, रब्बी ज्वारी आदी पिकांच्या पेरणीत गुंतले आहेत. 

यंदा पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जमिनीत ओलावा जास्त आहे. परिणामी, काही भागात रब्बीच्या पेरणीला विलंब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नांदेड पाटबंधारे विभागाकडून विष्णुपुरी, मानार, लिंबोटी, इसापूर, सिद्धेश्वर, येलदरी या प्रकल्पाच्या पाणी पाळ्यांचे नियोजन जाहीर केलेले नाही. यामुळे गव्हाच्या पेरणीला दिवाळीनंतरचा मुहूर्त येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी घरी राखून ठेवलेले हरभरा बियाणे वापरत आहेत. 

जिल्ह्यात रब्बी पेरणीला सुरवात झाली आहे. पावसाचे प्रमाण यंदा अधिक असल्याने पेरणी क्षेत्र वाढेल. यातून खरिपातील काही प्रमाणात नुकसान भरून निघण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरताना पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करून पेरणी करावी.  
- रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.


इतर बातम्या
नवीन ११४० कृषिपंपांना जोडण्या ः पडळकरनांदेड : ‘‘राज्य शासनाने सुरू केलेल्या कृषिपंप...
नाशिक: किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत...नाशिक: खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये केंद्र...
सांगली जिल्ह्यात बाधित पिकांचे पंचनामे...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी...
जळगाव : नावासह पत्ता दुरुस्तीसाठी  ६५...जळगाव : जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडत जळगाव ः खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडतच सुरू...
नाशिक : दुधाळ जनावरांच्या गटवाटप ...नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण...
सोलापूर :सिद्धेश्‍वर कारखान्याला...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्जपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...