खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटात

खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटात
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटात

जळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. आताच पाणीटंचाईच्या झळा जाणवत असल्याने आगामी काळात काय होईल, याची चिंता सतावत आहे. यामुळे रब्बी हंगामही संकटात सापडला आहे.

या वर्षी पावसाने सुरवातीनंतर घोर निराशा केली. परिणामी दुष्काळाचे गंभीर संकट ओढवले. याचा विपरीत परिणाम होऊन आगामी काळात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. जळगाव जिल्ह्यात पारोळा, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, बोदवड व धरणगाव तालुक्‍यात संकट वाढले आहे. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, धुळे व साक्री भागात समस्या बिकट आहे. नंदुरबारमध्ये नंदुरबार पूर्व व शहादा पूर्व भागात जलसंकट तीव्र होत आहे. पाणी पातळी घटल्याने कांदा लागवड रखडली आहे. मका, गहू ही अधिक पाण्याची पिके पेरण्यावर परिणाम होत आहे. पूर्वहंगामी कापसाला पाणी देऊ शकत नाहीत, अशी स्थिती आहे.

पाणी व चाराटंचाई पाहता जनावरांचे बाजारही ओस पडले आहेत. बाजारात ६० हजार रुपये किमतीची बैलजोडी केवळ ३० ते ३५ हजारात विकली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील वरखेडी, चाळीसगाव, नेरी येथील पशुधनाच्या बाजारावर दुष्काळाचे सावट आहे. दुग्ध व्यवसायावर परिणाम झाला आहे. जनावरांना चारा नसल्याने अनेक दुग्धव्यावसायिकही आता वेगळ्या व्यवसायांकडे वळू पाहत आहेत. तसेच डिसेंबरमध्ये शेतीची कामे संपणार असल्याने पुढील सहा महिने कसे काढावेत, हा प्रश्‍न आहे.

धुळे जिल्ह्यातील कापडणे, न्याहळोद, लामकानी, जापी, धनूर, कौठळ भागातील भाजीपाल्याची शेती संकटात आहे. धुळे तालुक्‍यातील नेर, कुसुंबा भागात स्थिती तेवढी बरी आहे. शिरपूर तालुक्‍यातील सातपुडालगतच्या गावांमध्येही जलपातळी घटल्याने ऊस, केळीच्या शेतीला फटका बसू लागला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com