Agriculture news in Marathi, Radhakrishna Vikhe-Thorat will play election | Agrowon

राधाकृष्ण विखे-थोरात यांच्यात रंगणार सामना

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नगर ः राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत असलेले गृहनिर्माण मंत्री आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विखे पाटील यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र येथून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे चुलतबंधू सुरेश थोरात निवडणूक रिंगणात आहेत. आता थोरात हे विखे-पाटील यांना किती ताकदीने लढत देतात याची उत्सुकता आहे. 

नगर ः राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत असलेले गृहनिर्माण मंत्री आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. विखे पाटील यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र येथून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे चुलतबंधू सुरेश थोरात निवडणूक रिंगणात आहेत. आता थोरात हे विखे-पाटील यांना किती ताकदीने लढत देतात याची उत्सुकता आहे. 

राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचे स्थान महत्त्वाचे राहिले आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे हे संगमनेरचे. नगरच्या राजकारणातील विखे पाटील परिवारही कायम चर्चेत राहिला आहे. लोकनेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी लोकसभेत कॉंग्रेसकडून अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. आता त्यांचे नातू खासदार डॉ. सुजय विखे भाजपकडून निवडून आले आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून सुजय विखे यांना उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राधाकृष्ण विखे सध्या गृहनिर्माण मंत्री आहेत. विखे पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यपद आले. विखे-थोरात यांचा राजकारणातील संघर्ष नगर जिल्ह्याने कायमच अनुभवला आहे. विखे यांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर थोरात- विखे यांचा राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. 

जिल्ह्यात भाजप-सेना युतीचे बाराही आमदार निवडून आणणार असे विखे पाटील यांनी अनेकदा सांगितले. त्यांच्या प्रयत्नातून अनेकांनी कॉंग्रेस पक्षही सोडला. थोरात यांनी मात्र विखे यांना शिर्डीतून तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आमदार सुधीर तांबे किंवा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे निवडणूक रिंगणात असतील असा अंदाज बांधला जात असताना शिर्डीतून कॉंग्रेसने सुरेश थोरात यांना रिंगणात उतरवले आहे. मुळात या मतदार संघावर विखे पाटील यांची कायम पकड आहे. 

संगमनेर तालुक्यातील आश्वी पट्टयातील २८ गावे शिर्डी मतदार संघात आहेत. त्याचा थोरात यांना फायदा होईल, असे वाटत असले तरी विखे पाटील यांना पराभूत करणे एवढे सोपे नाही असे दिसत आहे.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...