राधाकृष्ण विखे यांचा आमदारकीचा राजीनामा

राधाकृष्ण विखे
राधाकृष्ण विखे

मुंबई: विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (ता. ४) आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. विखे यांनी याआधीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. राधाकृष्ण विखे पाटील हे विधान भवनात राजीनामा देण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्याबरोबर आमदार सत्तार उपस्थित होते. या वेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, माझी काँग्रेसमध्ये कोंडी होत असून, आता माझी इथे घुसमट होत आहे. मला अनेक आमदार भेटत आहेत, परंतु त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. मी मात्र एकटा राजीनामा देत आहे. या अगोदर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर एक बैठक पार पडली, या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार, आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, माढाचे खासदार रणजित निंबाळकर आदी उपस्थित होते. या बैठकीनंतरच राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हेदेखील भाजप प्रवेशाच्या वाटेवर आहेत. मात्र आमदार सत्तारांच्या प्रवेशास भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच विरोध होत आहे.  राधाकृष्ण विखेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेसला लोकसभेत फटका बसल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. आता राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसला आणखी एक धक्का देणार असल्याचे बोलले जाते.  या आठवड्यात राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या काही आमदार, नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांसह भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर विखेंच्या भाजप प्रवेशानंतर त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले जाणार का? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com