बीटी, जीएमला वैज्ञानिक अप्रगल्भतेतून विरोध : रघुनाथदादा

raghunathdada
raghunathdada

पुणे: बीटी आणि जीएम वाणांच्या चाचण्या जगभरात १० वर्षांपूर्वीच झालेल्या आहेत. या चाचण्यांमधून मानव, प्राणी, पक्षी आणि पाण्यालादेखील अपाय होणार नाही, अशा चाचण्या झालेल्या आहेत. मात्र सध्या काही जण या संशोधनाला आणि तंत्रज्ञनाला विरोध करत आहेत. त्यांच्याकडे या संशोधनाचे माप काढण्याची फूटपट्टी तरी आहे का, वैज्ञानिक प्रगल्भता आहे का, असे प्रश्‍न शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले आहेत.  पाटील म्हणाले, ‘‘बीटी कापसाची सुरवात गुजरातमध्ये चोरट्या मार्गाने झाली. जेव्हा शेतकऱ्यांनी बीटी कापूस चोरून लावल्यानंतर हे पीक अतिशय चांगले आले म्हणून पाहणी झाल्यावर बीटी आहे हे कळाले. तेव्हा सरकारने हे पीक उपटुन टाकण्यासाठी पोलिस बळाचा वापर केला. त्या वेळी शरद जोशी यांच्यासह आम्ही शेतकरी संघटनेने या पिकांच्या काठ्या घेऊन संरक्षणासाठी उभे राहिलो. यानंतर टप्प्याटप्प्याने बीटी कापसाने नियमित उत्पादन शेतकरी घेऊ लागल्याने, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे.  शेतकरी हे स्वतंत्र्याचे उपभोक्ते असून, त्यांना तंत्रज्ञनाच्या वापरापासून रोखू नये. अशी आमची सरकारकडे मागणी आहे. शेतकऱ्यांला एखादा वाण नाही आवडला तर तो वापरणार नाही. याबाबत सरकारने शेतकऱ्यांवर जबरदस्ती करू नये. नवनवीन संशोधनामध्ये आता मानवी गर्भालादेखील पोटात असताना उपचार केले जातात. त्यानंतर तो गर्भ सुदृढ जन्माला येतो. तशीच प्रक्रिया विविध पिकांच्या नवीन वाणांच्या संशोधनात वापरली जात आहे. मात्र सध्या जे बीटी आणि जीएम वाणाला विरोध करत आहेत. त्यांचा हा विरोध संशोधनाला नसून शेतकऱ्यांना आहे. ‘‘विविध क्षेत्रांत नवनवीन संशोधने होत आहेत. संरक्षणक्षेत्रात राफेल विमानांचे संशोधन होत आहे. आरोग्याच्या क्षेत्रात नवनवीन संशोधने, उपचार पद्धती विकसित होत आहेत. त्याला हे लोक विरोध करत नाहीत. मात्र शेती क्षेत्रातील संशोधनाला यांचा विरोध आहे. सरकारला भविष्यात शेतीमालाला भाव देण्यापेक्षा, आयात शेतीमालावरच देश चालवायचा असल्याचे षडयंत्र सध्या रचले जात आहे. हे शेती आणि शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे आहे. त्यामुळे सरकारची फजिती होईल असे वागू नये. भविष्यात विविध पिकांच्या वाणांची तस्करी होऊन, नवनवीन वाण शेतकरी घेतल्याशिवाय राहणार नाहीत,’’ असेही श्री. पाटील म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com