कापसाचा नवीन हंगाम (२०१९-२०) सुरू होऊन जवळपास दोन महिने संपायच्या बेतात आहेत, परंतु आज सु
बातम्या
पीकविमा कंपन्या या सरकारपुरस्कृत माफिया ः रघुनाथदादा पाटील
पुणे ः पीकविमा कंपन्या या सरकारपुरस्कृत माफिया झाल्या असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने २०१८ मधील मंजूर खरीप पीकविमा मिळण्याबाबत येथील दि ओरिएंटल विमा कंपनीच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मुक्काम सत्याग्रहाला श्री. पाटील यांनी सोमवारी (ता. १८) भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा दिला. या वेळी ते बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांनी पीकविम्याचे हप्ते वेळेवर भरूनसुद्धा नैर्सगिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई कंपन्या देत नाहीत. त्यांच्या मुजोरपणाला सरकारचा पाठिंबा आहेत. ज्याप्रमाणे वाहन, व्यक्ती यांचे विमा हप्ते भरण्यासाठी कंपन्यांचे प्रतिनिधी ग्राहकांकडे येतात. त्याप्रमाणे पीकविम्याची सेवा कंपन्या शेतकऱ्यांना का देत नाहीत. शेतकऱ्यांना लुटण्याचा कंपन्यांचा हेतू आहे. यावेळी अजित अभ्यंकर, कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले उपस्थित होते.