agriculture news in marathi, raghunathdada patil speaks about district banks issue, pune, maharashtra | Agrowon

जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी शहामृगाची भूमिका घेऊ नये ः रघुनाथदादा पाटील

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या निधीवर चालणाऱ्या जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंका लुटल्या जात असताना शिखर बॅंकेने नेमके काय केले, याचा खुलासा प्रशासकांनी करावा. विद्याधर अनास्कर यांनी शहामृगाची भूमिका घेऊ नये, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. 

पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या निधीवर चालणाऱ्या जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंका लुटल्या जात असताना शिखर बॅंकेने नेमके काय केले, याचा खुलासा प्रशासकांनी करावा. विद्याधर अनास्कर यांनी शहामृगाची भूमिका घेऊ नये, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. 

श्री. पाटील म्हणाले, की बॅंकांनी केवळ मलिदा खाण्याचे काम केले. मात्र, बॅंका बुडत असताना वेळोवेळी शिखर बॅंकेने काय केले हे कधीही शेतकऱ्यांना सांगितले नाही. शिखर बॅंकेचे प्रशासक म्हणून विद्याधर अनास्कर यांनी केवळ शहामृगासारखे जमिनीत डोके खूपसून बसू नये. जिल्हा बॅंकांना जाब विचारण्याची तसेच त्यांना शेतकरीभिमुख चांगला कारभार करण्यासाठी दबाव टाकण्याची जबाबदारी रिझर्व्ह बॅंक, नाबार्ड, सहकार खात्याप्रमाणेच शिखर बॅंकेची देखील आहे. 

सहकार विभाग आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे गावांमधील सोसायट्या संपल्या. सोसायट्यांमधील शेकडा दहा रुपयांचे शेअर गोळा केले गेले. हा पैसा जिल्हा बॅंकांकडे गेला. या बॅंकांना पुन्हा शासन, नाबार्ड आणि ठेवीच्या रूपाने पैसा मिळत गेला. त्यातून बॅंकांचा कारभार सुरू झाला. मात्र, भ्रष्ट पुढाऱ्यांनी बॅंका संपविल्या. त्यामुळे पतपुरवठ्याची साखळी तुटली. शेतकरी सावकाराच्या दारात गेले. कर्ज तगाद्यामुळे अपमान सहन न झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशा स्थितीतही शिखर बॅंक गप्प कशी, असा सवाल श्री. पाटील यांनी उपस्थित केला.

भाजप सरकारदेखील जिल्हा बॅंकांबाबत दुटप्पी आहे. कारण, विदर्भात भाजपची चलती असताना तेथील बॅंका आजारी कशा पडल्या. नगर, उस्मानाबाद, लातूर या जिल्हा बॅंकांची वाईट स्थिती कशी झाली. या बॅंकांमधील गैरव्यवहाराची चौकशी न करता त्यांना स्वतःच्या पक्षात घेऊन भाजपने पवित्र करून घेतले आहे, असा आरोप श्री. पाटील यांनी केला.


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...