राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण समितीवर निवड 

वनस्पती विविधता संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरण यांच्या वतीने देशी बीज व वनस्पती संवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. या पुरस्कार निवड समितीवर कोंभाळणे (येथील राहीबाई सोमा पोपेरे यांची निवड करण्यात आली आहे.
Rahibai Popere elected to the Plant Protection Committee
Rahibai Popere elected to the Plant Protection Committee

नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने स्थापन केलेल्या वनस्पती विविधता संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरण यांच्या वतीने देशी बीज व वनस्पती संवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. या पुरस्कार निवड समितीवर बीजमाता म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या कोंभाळणे (ता. अकोले, जि. नगर) येथील राहीबाई सोमा पोपेरे यांची निवड करण्यात आली आहे. 

वनस्पती विविधता संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अधिष्ठाता डॉ. टी. के. नागरत्ना यांनी निवडीबाबत राहीबाई पोपेरे यांना निवड पत्राद्वारे कळविले आहे. या समितीमार्फत देशपातळीवर पारंपरिक बियाणे संवर्धन, निर्मिती, संगोपन व प्रचार-प्रसाराचे कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळ व समित्या यांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराने गौरविण्यात येते. 

देशातील असे कार्य करणारे घटक निवडण्याची जबाबदारी या समितीवर असते. देशपातळीवर दरवर्षी सुमारे ८५ लाख रुपयांचे पुरस्कार या समितीच्या माध्यमातून निवडलेल्या पुरस्कार्थींना दिले जातात. या समितीची सदस्या म्हणून राहीबाई यांना २०१७-१८ वर्षातील पुरस्कारार्थी निवड करण्यासंबंधी संधी मिळाली आहे. 

राष्ट्रीय पातळीवरील समितीमध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्कार निवड समितीत काम करण्याचा मान मिळालेल्या राहीबाई या पहिल्या महिला ठरल्या आहेत. या अगोदरही राष्ट्रीय पातळीवर राहीबाई यांनी केलेल्या देशी बीज संवर्धनाची दखल घेत भारत सरकारने त्यांना नारीशक्ती आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

त्यांच्या या निवडीबद्दल बायफ संस्थेचे अध्यक्ष गिरीश सोहोनी यांसह ‘बायफ’चे रिजनल डायरेक्टर व्ही. बी. द्यासा, राज्य समन्वयक सुधीर वागळे, अतिरिक्त राज्य समन्वयक प्रदीप खोशे, विषय तज्ज्ञ संजय पाटील, डॉ. विठ्ठल कौठाळे, योगेश नवले या मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com