Agriculture news in marathi Rahibai Popere elected to the Plant Protection Committee | Page 2 ||| Agrowon

राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण समितीवर निवड 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 एप्रिल 2021

वनस्पती विविधता संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरण यांच्या वतीने देशी बीज व वनस्पती संवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. या पुरस्कार निवड समितीवर कोंभाळणे (येथील राहीबाई सोमा पोपेरे यांची निवड करण्यात आली आहे. 

नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने स्थापन केलेल्या वनस्पती विविधता संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरण यांच्या वतीने देशी बीज व वनस्पती संवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. या पुरस्कार निवड समितीवर बीजमाता म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या कोंभाळणे (ता. अकोले, जि. नगर) येथील राहीबाई सोमा पोपेरे यांची निवड करण्यात आली आहे. 

वनस्पती विविधता संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अधिष्ठाता डॉ. टी. के. नागरत्ना यांनी निवडीबाबत राहीबाई पोपेरे यांना निवड पत्राद्वारे कळविले आहे. या समितीमार्फत देशपातळीवर पारंपरिक बियाणे संवर्धन, निर्मिती, संगोपन व प्रचार-प्रसाराचे कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, मंडळ व समित्या यांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराने गौरविण्यात येते. 

देशातील असे कार्य करणारे घटक निवडण्याची जबाबदारी या समितीवर असते. देशपातळीवर दरवर्षी सुमारे ८५ लाख रुपयांचे पुरस्कार या समितीच्या माध्यमातून निवडलेल्या पुरस्कार्थींना दिले जातात. या समितीची सदस्या म्हणून राहीबाई यांना २०१७-१८ वर्षातील पुरस्कारार्थी निवड करण्यासंबंधी संधी मिळाली आहे. 

राष्ट्रीय पातळीवरील समितीमध्ये महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्कार निवड समितीत काम करण्याचा मान मिळालेल्या राहीबाई या पहिल्या महिला ठरल्या आहेत. या अगोदरही राष्ट्रीय पातळीवर राहीबाई यांनी केलेल्या देशी बीज संवर्धनाची दखल घेत भारत सरकारने त्यांना नारीशक्ती आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

त्यांच्या या निवडीबद्दल बायफ संस्थेचे अध्यक्ष गिरीश सोहोनी यांसह ‘बायफ’चे रिजनल डायरेक्टर व्ही. बी. द्यासा, राज्य समन्वयक सुधीर वागळे, अतिरिक्त राज्य समन्वयक प्रदीप खोशे, विषय तज्ज्ञ संजय पाटील, डॉ. विठ्ठल कौठाळे, योगेश नवले या मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...
वाशीम जिल्ह्यात कृषी निविष्ठा...वाशीम : जिल्ह्यातील शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि...
रसवंतीचालक, ऊस उत्पादकांना आर्थिक...बुलडाणा : ‘‘जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो शेतकरी...
‘ताकारी’तून तिसरे आवर्तन सुरूवांगी, जि. सांगली  : ताकारी योजनेतून यंदाचे...
नगर, नाशिकमध्ये १४ साखर कारखान्यांचा...नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत २६...
सांगलीत द्राक्ष बागांची खरड छाटणी अंतिम...सांगली : पुढील हंगामातील घडांची निर्मिती आणि...
‘कादवा’कडून ३०० चा तिसरा हप्ता...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत...