agriculture news in Marathi, Rahul Gandhi says, Narendra modi destroyed country, Maharashtra | Agrowon

मोदींनी देशाला बरबाद केलेः राहुल गांधी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

औसा, जि. लातूर: मोदी सरकारने काही मोजक्या उद्योगपतींचे साडे पाच लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. कर्ज थकीत राहिले तर शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. यातून कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत आहे. या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. बेरोजगारी वाढली आहे. चंद्रावर यान पाठवून तरुणांचे पोट भरत नाही. मोदींनी देशाला बरबाद केले, अशी टीका काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केली. 

औसा, जि. लातूर: मोदी सरकारने काही मोजक्या उद्योगपतींचे साडे पाच लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. कर्ज थकीत राहिले तर शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. यातून कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करीत आहे. या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. बेरोजगारी वाढली आहे. चंद्रावर यान पाठवून तरुणांचे पोट भरत नाही. मोदींनी देशाला बरबाद केले, अशी टीका काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी केली. 

राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पहिली सभा लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघात  रविवारी (ता. १३) घेतली. या वेळी माजी केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राजीव सातव, काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील (औसा), अमित देशमुख (लातूर शहर), मधुकरराव चव्हाण (तुळजापूर) आदी मान्यवर उपस्थित होते.

कसे आहात... तुमचा मुड कसा आहे... बेरोजगारी आहे का... युवकांना रोजगार मिळाला का... शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली का... मग अच्छे दिन आले का... असे प्रश्न विचारत गांधी यांनी भाषणाला सुरवात केली. महाराष्ट्रातील रक्तात, हृदयात काँग्रेस भिनली आहे. ती कोणाला बाजूला करता येणार नाही. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षच जिंकणार, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला. 

मोदी सरकारने उद्योगपतींचे साडे पाच लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. कर्ज थकीत राहिले तर शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. नोटाबंदी, गब्बरसिंग टॅक्सने (जीएसटी) तर देशाचा सत्यानाश केला. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या जनतेला यातून मारण्यात आले. अर्थव्यवस्था उदध्वस्त करून टाकली आहे. आता नुकसान सुरू झाले आहे. येत्या सहा महिन्यांत काय हाल होतील. मोदींनी देशाला बरबाद केले, असे शेतकरी, सर्वसामान्य लोक, युवक म्हणत आहेत. पण मीडियात याबाबत एक शब्दही बोलला जात नाही. बेरोजगारी वाढली, कर्जमाफी केली नाही. हेही मीडियातून सांगितले जात नाही. जनतेचे मुद्दे उचलले जात नाहीत, असा आरोप गांधी यांनी केला.  

एकामागून एक कारखाने बंद होत आहेत. ॲटोमोबाईल क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. कपडा उद्योग-हिऱ्यांचा उद्योग बंद पडला. हे काय चालले आहे, समजून घ्या. सत्ताधारी कधी काश्मीरच्या मुद्यावर तर कधी ३७० च्या मुद्यावर बोलतात. पण जनतेच्या मुद्यावर बोलत नाहीत. मोदीजी, शहा हे खऱ्या मुद्यावरून आपले लक्ष विचलीत करून ते दुसरीकडे नेवू पाहत आहेत. हे आताच ओळखले पाहिजे. भारताचा मेक इन इंडिया नाही तर मेक इन चायना झाला आहे, अशी टीकाही गांधी यांनी केली.

आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना फसवले. आम्ही फसवणार नाही, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. फडणवीस सरकार फसवणूक सरकार आहे. विमा मिळाला नाही. शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले नाही. बेरोजगारी वाढवली. कारखाने बंद. त्यामुळे कुठलाच घटक समाधानी नाही. या सरकारला जनता नाकारेल. असे श्री. थोरात म्हणाले. या वेळी श्री. खर्गे, श्री. चाकूरकर, श्री. बसवराज पाटील, श्री. अमित देशमुख यांचे भाषण झाले.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...