agriculture news in marathi, rahul gandhi target to government on several issues, yavatmal, maharashtra | Agrowon

आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत कर्जमाफी : राहूल गांधी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना निकष आणि उद्योजकांसाठी विनाअट कर्जमाफीचे धोरण राबविणाऱ्यांकडून शेतकरी हित जपले जाणे शक्‍य नाही. त्यामुळे त्यांना नकार देत काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या हातात सत्तेची सूत्रे सोपवा. आमचे सरकार आल्यास चार महिन्यांत संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. 

वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना निकष आणि उद्योजकांसाठी विनाअट कर्जमाफीचे धोरण राबविणाऱ्यांकडून शेतकरी हित जपले जाणे शक्‍य नाही. त्यामुळे त्यांना नकार देत काँग्रेस, राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या हातात सत्तेची सूत्रे सोपवा. आमचे सरकार आल्यास चार महिन्यांत संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. 

जिल्ह्यातील वणी येथे काँग्रेस उमेदवार वामनराव कासावर यांच्या प्रचारासाठी मंगळवारी (ता. १५) आयोजित सभेत राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, की विकासाची स्वप्ने दाखवत सत्ताप्राप्तीचा उद्देश भाजपने साधला. ७० वर्षांत काय झाले असा प्रश्‍न त्यांच्याकडून विचारला जातो. मग देशभरात गावांपासून ते शहरांपर्यंत प्राथमिक सुविधा कोणी निर्माण केल्या? उलट भाजपने विकासाच्या मुद्द्यावर जनतेला भुलवले. कोणताच विकास न करता खेड्यांपासून शहरापर्यंतची आर्थिक व्यवस्था खिळखिळी केली. अनेक आर्थिक संस्था मंदीच्या कक्षेत आहेत. बॅंकांची स्थिती वाईट आहे; उद्योजकांकडून कर्जभरणा होत नाही. सामान्यांच्या पैशाची उधळण जाहिरातींवर केली जात आहे. त्या माध्यमातून स्वतःचेच ब्रॅंडिंग करून विकासाला खो दिला गेला आहे.  


इतर ताज्या घडामोडी
हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची...पुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान...
हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच...मुंबई  ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू...
गायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढपुणे  ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून...
लाल कांद्याच्या दरात सुधारणा नाशिक  : दरवर्षीच्या प्रमाणे लाल कांद्याची...
सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीपोटी मिळणार...सोलापूर  : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात...
ठाकरे सरकारचे उद्यापासून पहिलेच अधिवेशनमुंबईः नागपूर येथील छोटेखानी हिवाळी अधिवेशनात...
ग्रासपेंटिंगच्या माध्यमातून...शिराढोण ः उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी (ता. कळंब...
तनपुरे कारखाना चालावा ही जिल्हा बॅंकेची...नगर : "डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची...
औरंगाबादमध्ये कांदा १२०० ते ८००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नांदेड, परभणी, हिंगोलीत नुकसानीपोटी ५७८...नांदेड : अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या...
कोल्हापुरात पुष्प प्रदर्शनास प्रारंभकोल्हापूर  : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर...
कळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक  : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...
नुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...
सटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज...पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस...औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर...
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या...पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२०...
काळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेकअमरावती  ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी...
मराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर...उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख...
अकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंतअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला...