agriculture news in Marathi rahuri university famous for transfers, quarrels and bribe Maharashtra | Agrowon

बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी विद्यापीठ

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

मारहाण, वादग्रस्त कुलसचिवाची नियुक्ती व आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने एका कर्मचाऱ्याला केलेली अटक, यामुळे कृषी शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात प्राध्यापकाला झालेली मारहाण, वादग्रस्त कुलसचिवाची नियुक्ती व आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने एका कर्मचाऱ्याला केलेली अटक,  यामुळे कृषी शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. 

‘‘राहुरी विद्यापीठाचे नाव कधी काळी देशभरातील कृषी शास्त्रज्ञांमध्ये आदराने घेतले जात होते. मात्र, कुलगुरू निवडीचा गोंधळ, लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकलेल्या कुलसचिवाची झालेली नियमबाह्य नियुक्ती, बदल्यांमध्ये घातलेला धुडगूस यामुळे संस्थेची प्रतिमा धोक्यात आली. आता तर थेट प्राध्यापकाला मारहाण, लाचखोराला अटक असे प्रकार होवू लागले आहे. त्यामुळे विद्यापीठ धोक्याच्या दिशेने जात आहे,’’ असा इशारा एका ज्येष्ठ प्राध्यापकाने दिला आहे. 

कोविड कालावधीत विद्यापीठाच्या सुरक्षा अधिकाऱ्याचे काम समाधानकारक न वाटल्याने त्याच्याकडून पदभार काढून घेण्यात आला होता. यात प्रा. राहुल देसले यांचा संबंध असल्याची चुकीची माहिती या अधिकाऱ्याला कोणी तरी दिली. त्यामुळे प्रा. देसले यांना या अधिकाऱ्याने विद्यापीठाच्या आवारातच बेदम मारहाण केली.

‘‘प्रा. देसले यांना मारहाण झाल्याची घटना खरी आहे. मात्र, त्यात विद्यापीठ प्रशासनाचा दोष नाही. आम्ही उलट पोलिसांना पाचारण केले. हल्लेखोराला अटक तसेच निलंबनाची देखील कारवाई घडली आहे. या प्रकरणाची कुलगुरूंनी गंभीर दखल घेतली आहे,’’ असा दावा प्रशासनातील एका अधिकाऱ्याने केला. 

दुसऱ्या बाजूला विद्यापीठातील लाचखोरीचा मुद्दाही ऐरणीवर आलेला आहे. बदल्या, कंत्राट वाटप, निवृत्तिवेतन, वैद्यकीय रजा, नियुक्त्या अशा विविध कामांमध्ये अडवणुकीचे प्रमाण गेल्या १० वर्षांत वाढल्याचे कर्मचारी सांगतात. शिस्त आणि प्रामाणिक कामकाज करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना नेतृत्वाने वाऱ्यावर सोडल्याने विद्यापीठाला हे दिवस आले, असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. 
२१ ऑक्टोबरला विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयाचा लिपिक ज्ञानेश्वर काशिनाथ बाचकर याला लाच घेताना रंगेहात पकडल्याचे नगरचे पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी जाहीर करताच विद्यापीठात खळबळ उडाली.

‘‘विद्यापीठ प्रशासनाचा बट्ट्याबोळ करण्यात एका चौकडीचा हात आहे. आपल्या मर्जीतील कुलगुरू बसवून पुन्हा धुडगूस कसा घालता येईल, यात ही चौकडी गुंतली आहे,’’ अशी हताश प्रतिक्रिया विद्यापीठाच्या एका माजी संचालकाने व्यक्त केली.

प्रतिक्रिया
राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांवर कामाचा ताण आहे. अशा स्थितीतही प्रत्येक जण गुणवत्तेने काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रा. राहुल देसले हे राहुरी विद्यापीठातील चांगल्या पद्धतीने अध्यापन करीत असताना त्यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत .
- प्रा. दिनकर जीवतोडे, अध्यक्ष, कृषी विद्यापीठ संघ

कृषी विद्यापीठात लाचखोरीबद्दल सापळा रचून अटक होणे हे धक्कादायक आहे. शास्त्रज्ञांच्या दिवसरात्र मेहनतीने उभ्या राहिलेल्या या विद्यापीठाची प्रतिमा आम्ही जपली. विद्यापीठात थेट प्राध्यापकाला मारहाण किंवा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या धाडी पडणे असे प्रकार कधीही घडले नव्हते. या पवित्र संस्थेची अशी मानहानी होताना पाहून आम्हा कृषी शास्त्रज्ञांना खंत वाटते.
- डॉ. राजाराम देशमुख, माजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ


इतर बातम्या
पीककर्जाची प्रकरणे तत्काळ मार्गी लावा...नाशिक ः ‘‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान...
नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या दरात...नाशिक : सोमवारी (ता. २३) जिल्ह्यातील प्रमुख बाजार...
कुरखेड्यात ‘महावितरण’वर शेतकऱ्यांचा...गडचिरोली : कृषी पंपाच्या फिडरवर सुरू असलेले...
बुलडाणा जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने...बुलडाणा : जिल्ह्यात सुमारे १७४ गावांत गुलाबी...
मठपिंपळगाव-गोलापांगरीत द्राक्षात खर्च,...अंबड, जि. जालना : मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील...
`नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना...नांदेड : अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे...
बारामतीत हमीभावाने मका खरेदी सुरूपुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये कांदा चाळ अनुदानासाठी उपोषणनगर ः कृषी विभागाने पूर्वपरवानगी दिल्यानंतर...
जळगाव जिल्ह्यात केळीच्या विमा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून...
वीजजोड तोडल्यास आसूडाचा प्रहारकऱ्हाड,  जि.  सातारा : लॉकडाउन काळातील...
सांगली जिल्ह्यात दूध संकलनात २५ हजार...सांगली ः ऑक्टोबर ते जानेवारीअखेर हा दूध...
पीकविमा हप्ता २७ नोव्हेंबरपूर्वीच भरा...सिंधुदुर्ग : बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील...
‘वान’च्या पाण्याविरुद्ध नागरिकांचे धरणे अकोला : तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचे पाणी...
वीज जोडणी न देताच कृषीपंपाची लाखोंची...नांदेड : कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील पाच...
मराठवाड्यात कापसाच्या दरात किंचित...औरंगाबाद : खासगीत कापूस खरेदीचे दर किंचित...
परभणीत भाजपकडून वीजबिलांची होळी परभणी :  वाढीव वीज देयकांच्या निषेधार्थ...
खानदेशात ऊस लागवड वाढण्याची शक्यताजळगाव ः वाढती खासगी कारखानदारी व इतर...
जळगाव जिल्ह्यात कांदा बिजोत्पादन...जळगाव : जिल्ह्यात यंदा कांदा बिजोत्पादनाचे...
कलदगाव, नायगाव येथे कापूस खरेदी सुरु नांदेड  : भारतीय कपास निगमच्या (सीसीआय)...
सटाणा तालुक्यातील ऊस जळण्यास महावितरणच...नाशिक : सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील दोन...