अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरावर छापेमारी

शंभर कोटी वसुली प्रकरणी आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सोमवारी (ता. ११) केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने (सीबीआय) छापेमारी केली आहे.
अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरावर छापेमारी Raid on Anil Deshmukh's house in Nagpur
अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरावर छापेमारी Raid on Anil Deshmukh's house in Nagpur

नागपूर : शंभर कोटी वसुली प्रकरणी आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी सोमवारी (ता. ११) केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने (सीबीआय) छापेमारी केली आहे. सकाळी आठ वाजताच सीबीआयचे सात अधिकारी घरी पोहोचले असून, देशमुखांचा मुलगा आणि सुनेला अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत सीबीआयने त्यांना अटक केली नव्हती.  सीबीआयचे अधिकारी आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुखांच्या घरी पोहोचले. त्यांच्याकडे देशमुखांचे पुत्र सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचे वॉरंट आहे. त्यामुळे देशमुखांच्या मुलाला आणि सूनेला अटक होण्याची शक्यता वर्तविली जात होती. पण, देशमुख कुटुंबीय कुठे आहे? या बाबत अद्याप कोणालाही माहिती नाही. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा देशमुखांच्या मागे लागल्या आहेत. देशमुखांच्या घरी आतापर्यंत ईडीने सहावेळा, सीबीआयने तीनवेळा आणि आयकर विभागाने छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देशमुखांच्या संबंधित साई शिक्षण संस्थेच्या खात्यात चार कोटी रुपये जमा झाल्याने ते आणखीन अडचणीत आले आहेत. तसेच वारंवार नोटीस देऊन उपस्थित राहत नसल्याने देशमुख यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. सुमारे महिनाभरापासून ते अज्ञात स्थळी आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात असल्याचे बोलले जात आहे.  दरम्यान, न्यायालयाने देखील त्यांना समन्स जारी करून ईडीच्या चौकशीसाठी का हजर राहत नाही? या बाबत विचारणा केली होती. मात्र, देशमुख नेमके कुठे याचा थांगपत्ता लागलेला नाही. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी फक्त पुन्हा वॉरंट बजावले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com