नाशिकला ‘राष्ट्रवादी युवक’चे रेल रोको आंदोलन

नाशिकला ‘राष्ट्रवादी युवक’चे रेल रोको आंदोलन
नाशिकला ‘राष्ट्रवादी युवक’चे रेल रोको आंदोलन

नाशिक  : केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकारविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकरोड रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी रेल्वे सुरक्षा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. ''जॉब दो, जवाब दो, फडणवीस सरकार जॉब दो'' अशा घोषणा देत कार्यकर्ते रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना रेल्वे सुरक्षा पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडविले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी मनमाड-भुसावळ रेल्वे थांबवून सरकारचा निषेध केला. सरकारने ‘मेक इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्र स्टार्ट अप इंडिया’, ‘प्रधानमंत्री युवा योजना’ अशा फसव्या योजना काढून जाहिरातबाजी केली; परंतु यावर ठोस पावले उचलली नाहीत. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ‘रेल रोको’ आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदविला. या वेळी दिंडोरी लोकसभा जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, माजी जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, योगेश निसाळ, अॅड.चिन्मय गाढे, धीरज बच्छाव, सुनील कोथमिरे, विजय जाधव, शिवराज ओबेरॉय, डॉ. संदीप चव्हाण, शाम हिरे, हिमांशू चव्हाण, रेहान शेख, राजू उफाडे, नदीम शेख, गणेश गायधनी, जयराम शिंदे, संदेश टिळे, निखील भागवत, तुषार खांडबहाले, दीपक गायकवाड, गोरख ढोकणे, रवि बस्ते, सुनील आहेर, सायरा शेख, तौसीफ मणियार, संदीप भेरे, प्रमोद सांगळे, अक्षय कहांडळ, अक्षय भोसले, सोनू वायकर,  नितीन निगळ, प्रमोद सांगळे, प्रवीण जमधडे, अजिंक्य गीते आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com