Agriculture news in marathi; Rail Roko Movement of 'Nationalist Youth' in Nashik | Agrowon

नाशिकला ‘राष्ट्रवादी युवक’चे रेल रोको आंदोलन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

नाशिक  : केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकारविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकरोड रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात आले.

नाशिक  : केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकारविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकरोड रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात आले.

या वेळी रेल्वे सुरक्षा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. ''जॉब दो, जवाब दो, फडणवीस सरकार जॉब दो'' अशा घोषणा देत कार्यकर्ते रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना रेल्वे सुरक्षा पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडविले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी मनमाड-भुसावळ रेल्वे थांबवून सरकारचा निषेध केला.

सरकारने ‘मेक इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्र स्टार्ट अप इंडिया’, ‘प्रधानमंत्री युवा योजना’ अशा फसव्या योजना काढून जाहिरातबाजी केली; परंतु यावर ठोस पावले उचलली नाहीत. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ‘रेल रोको’ आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदविला.

या वेळी दिंडोरी लोकसभा जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, माजी जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, योगेश निसाळ, अॅड.चिन्मय गाढे, धीरज बच्छाव, सुनील कोथमिरे, विजय जाधव, शिवराज ओबेरॉय, डॉ. संदीप चव्हाण, शाम हिरे, हिमांशू चव्हाण, रेहान शेख, राजू उफाडे, नदीम शेख, गणेश गायधनी, जयराम शिंदे, संदेश टिळे, निखील भागवत, तुषार खांडबहाले, दीपक गायकवाड, गोरख ढोकणे, रवि बस्ते, सुनील आहेर, सायरा शेख, तौसीफ मणियार, संदीप भेरे, प्रमोद सांगळे, अक्षय कहांडळ, अक्षय भोसले, सोनू वायकर,  नितीन निगळ, प्रमोद सांगळे, प्रवीण जमधडे, अजिंक्य गीते आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे ः मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते कर्नाटक...
पीकविम्याला मुदतवाढ देण्याची ‘...अकोला ः या हंगामात पीकविमा भरण्यासाठी २४ जुलै ही...
‘त्या’ बँकांमधील शासकीय खाती बंद करणार...यवतमाळ : बँकांच्या आडमुठेपणामुळे शेतकरी...
परडा येथे मक्यावर लष्करी अळीचा...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मक्यावर मोताळा...
अमरावती जिल्ह्यात पीककर्जाचा टक्का...अमरावती  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी...
अकोल्यात सोयाबीन सरासरी ३६१० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
सातारा जिल्हा परिषदेचा १०० कोटींचा...सातारा : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच मूळ...
पुण्यात पीकविम्यासाठी शिवसेना रस्त्यावरपुणे ः ‘कोण म्हणतो देणार नाय विमा घेतल्याशिवाय...
पुणे विभागातील कोरडवाहू पट्ट्यात टंचाई...पुणे : विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर...
मराठवाड्यातील पाणीटंचाईत वाढऔरंगाबाद : पावसाने पाठ फिरविल्याने...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उतरविला १...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गंत खरिपासाठी...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत १५ चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील घटलेली चारा छावण्यांची...
अचूक पीक पेरणी अहवाल देणे शक्य नाही ः...बुलडाणा  ः जिल्ह्यातील पीक पेरणीचा...
आडसाली ऊस लागवडीला कोल्हापूर जिल्ह्यात...कोल्हापूर  : जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात...