रेल्वे प्रवाशांना मिळणार संपूर्ण तिकीट परतावा

सोलापूर : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन १४ एप्रिलनंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे सेवा सुरु होईल, या आशेने रेल्वे मंत्रालयाने ठरावीक मार्गांवर ऑनलाइन आरक्षण सुरु केले.
रेल्वे प्रवाशांना मिळणार संपूर्ण तिकीट परतावा
रेल्वे प्रवाशांना मिळणार संपूर्ण तिकीट परतावा

सोलापूर : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन १४ एप्रिलनंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे सेवा सुरु होईल, या आशेने रेल्वे मंत्रालयाने ठरावीक मार्गांवर ऑनलाइन आरक्षण सुरु केले. अनेक प्रवाशांनी तिकीट आरक्षणही केले, मात्र आता लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढल्याने बुकिंग केलेल्या सर्वच प्रवाशांना तिकिटाचा १०० टक्‍के परतावा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने नुकताच घेतला आहे. पश्‍चिम रेल्वेच्या सोलापूर विभागातील सिद्धेश्वर एक्‍स्प्रेस आणि इंटरसिटी यासह उद्यान एक्‍स्प्रेस अशा रेल्वे गाड्यांचे ऑनलाइन आरक्षण पूर्ण झाले होते. तत्पूर्वी, लॉकडाउन वाढल्यास तिकीट परतावा मिळेल, अशा ऑनलाइन सूचनाही प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. लॉकडाउन वाढल्याने रेल्वेची प्रवासी सेवा ३० एप्रिलपर्यंत बंदच राहणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. आता प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट रद्द करून घ्यावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com