निर्यातीकरिता रेल्वेने प्राधान्य द्यावे

रेल्वेकडून मात्र नाशवंत फळ असतानाही रेल्वे वॅगनची उपलब्धता करून दिली जात नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणात हस्तक्षेप करून रेल्वे प्रशासनाला निर्देश देण्यात यावे, अशी मागणी इंडो-बांगला ऑरेंज असोसिएशनने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे.
Railways should give priority to exports
Railways should give priority to exports

नागपूर ः संत्रा उत्पादकांसाठी कमी वेळेत आणि कमी खर्चात वाहतुकीचा पर्याय रेल्वेकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून यावर्षी बांग्लादेशला संत्रा निर्यात केली जाणार आहे. त्याकरिता संत्रा निर्यातदार तसेच शेतकऱ्यांनी अनामत रक्‍कमेचा भरणा करून बुकींग केले. परंतु रेल्वेकडून मात्र नाशवंत फळ असतानाही रेल्वे वॅगनची उपलब्धता करून दिली जात नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणात हस्तक्षेप करून रेल्वे प्रशासनाला निर्देश देण्यात यावे, अशी मागणी इंडो-बांगला ऑरेंज असोसिएशनने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली आहे. 

रेल्वेच्या माध्यमातून एक टन संत्रा वाहतुकीसाठी एक लाख सात हजार रुपये तर ट्रकव्दारे हाच खर्च एक लाख ४५ हजार रुपयांचा होतो. त्यासोबतच रेल्वेने माल देखील लवकर पोचतो. त्यामुळे बांग्लादेश निर्यातीकरीता यावर्षी निर्यातदार व शेतकऱ्यांकडून रेल्वेला पसंती देण्यात आली आहे. त्याच कारणामुळे एक लाख सात हजार रुपयांची अनामत रक्‍कम देखील ३० सप्टेंबर रोजी भरण्यात आली. २० पार्सल व्हॅन (२३ टन) आणि १ एसएलआर (४ टन) याप्रमाणे ४६८ टन संत्रा बांग्लादेशला पाठविण्याचे प्रस्तावित आहे. तब्बल २१ लाख ७० हजार रुपयांचा खर्च यावर होईल. संत्रा हे नाशवंत फळ असल्याने मंगळवारी (ता. १२) रेल्वे वॅगनची उपलब्धता होत संत्रा बांग्लादेशला पाठविण्यात यावा, अशी मागणी निर्यातदारांची आहे. 

रेल्वेकडून मात्र शेतमाल वाहतुकीसाठी कोटा पद्धत वापरली जात असल्याने मंगळवारी वॅगन उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे संत्रा बागायतदार व निर्यातदारांचे मोठे नुकसान होणार असल्याने ते लक्षात घेता मंगळवारी (ता. १२) वॅगन उपलब्धतेचे निर्देश द्यावे, अशी मागणी नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी इंडो-बांगला ऑरेंज असोसिएशनचे अध्यक्ष सोनू खान सज्जाद खान, रमेश जिचकार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com