नांदेड, परभणी, हिंगोलीतील १०१ मंडळांमध्ये पाऊस

नांदेड, परभणी, हिंगोलीतील १०१ मंडळांमध्ये पाऊस
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १०१ मंडळांमध्ये पाऊस

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १०१ मंडळांमध्ये शुक्रवारी (ता. १३) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. परिपक्वतेच्या अवस्थेतील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, बाजरी तसेच वाढीच्या अवस्थेतील तूर पिकांसाठी पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ६७ मंडळांमध्ये पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, मुदखेड, हदगाव, माहूर, किनवट, भोकर, उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा तालुक्यांतील मंडळांमध्ये पाऊस झाला. परभणी जिल्ह्यतील ३९ पैकी २५ मंडळांमध्ये पाऊस झाला. परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पू्र्णा तालुक्यांतील मंडळांमध्ये पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी ९ मंडळांमध्ये पाऊस झाला. वसमत, औंढा नागनाथ तालुक्यांतील मंडळांमध्ये पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः नांदेड जिल्हा ः नांदेड शहर २०, नांदेड ग्रामीण ६, तुप्पा ७, विष्णुपुरी १८, वसरणी २१, वजीराबाद १४, तरोडा ९, लिंबगाव ११, मुदखेड १५, मुगट १२, बारड १८, तामसा ८, मनाठा १०, आष्टी २४, अर्धापूर १४, दाभड ११, मालेगाव ४, किनवट १, मांडवी ८, बोधडी ३, दहेली २२, जलधारा ३, शिवणी २, माहूर ४, वानोळा ११, वाई बाजार १६, सिंदखेड १८, सरसम ६, भोकर २६, किनी ३१, मोगाली १०,  मातुल २०, उमरी २६,  सिंदी १८, गोलेगाव १४, धर्माबाद ८, जारिकोट ७, करखेली २४, नायगाव ८, नरसी ८, मांजरम २,  बरबडा ५,  कुंटुर १०, बिलोली १४, आदमपूर २६, लोहगाव १०, सगरोळी १७,  कुंडलवाडी १२, देगलूर १, खानापूर २, शहापूर ५, मालेगाव २, मुखेड १२, जांब ५, जाहूर २, चांदोला २०, कंधार ६,  कुरुला ७, उस्माननगर ४, पेठवडज ११, फुलवळ ८लोहा ५, माळाकोळी ३, कलंबर ६, शेवडी २०, सोनखेड १३, कापसी ११.

परभणी जिल्हा ः परभणी शहर ८, परभणी ग्रामीण ६, सिंगणापूर १६, दैठणा १०,  पेडगाव ५, पिंगळी १९, जांब ६, कुपटा ४, मानवत ५, केकरजवळ १, कोल्हा ५, पाथरी ६, बाभळगाव २, हदगाव १४, सोनपेठ ३, आवलगाव ३, गंगाखेड १०, महातपुरी २०, पालम २, चाटोरी १५, बनवस २, पूर्णा १२, ताडकळस ३४, चुडावा १५, लिमला १८.

हिंगोली जिल्हा ः वसमत ३, गिरगाव ४, कुरुंदा ४, टेंभुर्णी ३, आंबा ६, हयातनगर ३, औंढा नागनाथ १८, जवळा बाजार २, साळणा ५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com