नांदेड, परभणी, हिंगोलीतील १४० मंडळांत सरी

नांदेड, परभणी, हिंगोलीतील १४० मंडळांत सरी
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १४० मंडळांत सरी

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४० मंडळांमध्ये सोमवारी (ता. २) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ४, परभणीतील ७, हिंगोलीतील २ मंडळांत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. लोहा तालुक्यात दुचाकीवरून जाणारे दोन युवक ओढ्याच्या पुरात वाहून गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पालम तालुक्यातील जोरदार पावसामुळे गळाटी, लेंडी या नद्यांच्या पुरामुळे शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे नुकसान झाले. पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे ११ गावांचा संपर्क तुटल्याची स्थिती पाहायला मिळाली. 

नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ७२ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. लोहा तालुक्यातील लोहा, माळाकोळी, कलंबर, सोनखेड या चार मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे ओढे-नाल्यांना पूर आले. धानोरा - मक्ता (ता. लोहा) येथील शेतकरी बंडू एकनाaथ बोंडारे ( वय ४२), जयराम काशिनाथ भुजबळ ( वय ३५) हे रविवारी (ता. १) रात्री साडेनऊच्या सुमारास लोहा येथून दुचाकीवर गावाकडे जात होते. त्या वेळी पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

परभणी जिल्ह्यातील सर्व ३९ मंडळामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. झरी, बोरी, जिंतूर, सावंगी म्हाळसा, चिकलठाणा, राणीसावरगाव, चाटोरी या सात मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. ओढे, नाल्यांना पाणी आल्यामुळे दुधना, करपरा या नद्या प्रवाहित झाल्या. पालम तालुक्यातील सिरपूर तसेच परिसरातील शेती पिकांचे पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले.

पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे मासोळी (ता. गंगाखेड) येथील मध्यम प्रकल्पाच्या धरणामध्ये १४ टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी २९ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. सेनगाव आणि हत्ता मंडळांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे ओढे नाल्यांना पूर आले. पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्याने पिकांचे नुकसान झाले.

मंडळनिहाय पाऊस (मिमी) 

नांदेड जिल्हा नांदेड २४, नांदेड ग्रामीण ७,तुप्पा ३८, विष्णुपुरी ४२, वसरणी ४७, वजीराबाद १२, तरोडा ६, लिंबगाव १०,अर्धापूर १२, दाभड ९, मालेगाव ३८, मुदखेड ५८, मुगट ६४, बारड ४१, हदगाव ८, तामसा २८, मनाठा ३२, पिंपरखेड ३४, निवघा २७, तळणी ३१, आष्टी ९, शिवणी ५, माहूर ७, वाई १४, हिमायतनगर ३६, सरसम ७, जवळगाव १५, भोकर ४१, किनी ९,  मोगाळी १०, मातुल ८, सिंधी ७, धर्माबाद १३, जारिकोट ११, करखेली १२, नायगाव ७, नरसी १७, मांजरम १५, बरबडा ५, बिलोली १४, आदमपूर ३६, लोहगाव ६, सगरोळी ४७, कुंडलवाडी ८, देगलूर ३२, खानापूर २२, शहापूर ३९, मालेगाव १२, हनेगाव १०, मुखेड १५,जांब १६, येवती २५, जाहूर ८, चांडोळा २४, मुक्रमाबाद ११, बाऱ्हाळी ३१, कंधार ४०, कुरुला २५, उस्माननगर ४०, पेठवडज ७, फुलवळ ३२, बारुळ ४०, लोहा ९५, माळाकोळी ९३, कलंबर ९७, शेवडी ६०, सोनखेड ६६, कापशी २६.
परभणी जिल्हा परभणी ८, परभणी ग्रामीण ७, सिंगणापूर १०, दैठणा ८, पेडगाव १७.२०, पिंगळी ९, जांब १०, झरी ११०, बोरी ७९ , जिंतूर ६७, आडगाव ५५, सावंगी म्हाळसा ८०, बामणी ५२, चारठाणा ४५, सेलू १६, देऊळगाव ३५, कुपटा ३५, वालूर ४०, चिकलठाणा ९१, मानवत ३२, केकरजवळा ११, कोल्हा ३१, पाथरी २८, बाभळगाव ३२, हदगाव ४४, सोनपेठ ४१, आवलगाव ४५, गंगाखेड १२, राणीसावरगाव ६५, माखणी ३५, महातपुरी १०, पालम ५६, चाटोरी ६८, बनवस ४५, पूर्णा १५, ताडकळस २६, चुडावा १४, लिमला १६, कात्नेश्वर १२.
हिंगोली जिल्हा नरसी नामदेव ४, डिग्रस १४, आखाडा बाळापूर ५, डोंगरकडा १७, वारंगा फाटा ८,वाकोडी ३५, सेनगाव १०४, गोरेगाव ९, आजेगाव १२, साखरा १७,पानकनेरगाव १९, हत्ता ११०, वसमत १५, हट्टा ३३, गिरगाव १७, कुरुंदा १०, टेंभुर्णी ७, आंबा २५, हयातनगर ५, औंढा नागनाथ ५५, जवळा बाजार ४०, येळगाव ४४, साळणा ४२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com