agriculture news in marathi, Rain in 145 circles in Nanded, Parbhani, Hingoli | Page 2 ||| Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीतील १४५ मंडळांमध्ये पाऊस

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 जुलै 2018

नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. ९) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये या तीन जिल्ह्यांतील १४५ मंडळांतील गावशिवारात हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील निवघा (९३ मिमी), तळणी (९७ मिमी) अतिवृष्टी झाली. सोमवारी (ता. ९) दुपारपर्यंत अनेक मंडळांमध्ये भुरभुर पाऊस सुरू होता.

नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. ९) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये या तीन जिल्ह्यांतील १४५ मंडळांतील गावशिवारात हलका ते मध्यम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील निवघा (९३ मिमी), तळणी (९७ मिमी) अतिवृष्टी झाली. सोमवारी (ता. ९) दुपारपर्यंत अनेक मंडळांमध्ये भुरभुर पाऊस सुरू होता.

सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंत तीन जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस झाला आहे. काही तालुक्यांत जोरदार तर अनेक तालुक्यांत भिज पाऊस झाला. भिज पाऊस नुकत्याच उगवू लागलेल्या पिकांसाठी फायदेशीर ठरत आहे. तर मुसळधार पावसामुळे बांध फुटून जमीन खरडून गेल्या आहेत. त्यामुळे मुळ्या उघड्या पडून पिकांचे नुकसान झाले आहे.

नांदेड जिल्ह्यातील ७७ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. हदगाव, हिमायनगर, किनवट, भोकर तालुक्यांत पावसाचा जोर कायम होता. देगलूर, नायगाव, कंधार, मुखेडमध्ये जोर कमी झाला. नांदेड, अर्धापूर, बिलोली, लोहा तालुक्यांत जोर वाढला. परभणी जिल्ह्यातील ३८ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. पूर्णा, जिंतूर, सेलू, मानवत तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. पाथरी तालुक्यातील मंडळातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पावसाचा जोर कायम होता. वसमत, सेनगाव, हिंगोली, औंढा नागनाथ तालुक्यात जोर वाढला.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये) नांदेड जिल्हा ः नांदेड शहर १४, नांदेड ग्रामीण १३, वजीराबाद ११, वसरणी १६, तरोडा १५, तुप्पा १५, लिंबगाव ५५, विष्णुपुरी १७, अर्धापूर १९, दाभड १४, मालेगाव २२, हदगाव २८, तामसा २९, मनाठा ७, पिंपरखेड ४३, निवघा ९३, तळणी ९७, आष्टी १७, किनवट ४४, इस्लापूर २५, मांडवी २२, बोधडी १७, दहेली १७, जलधारा ७, शिवणी १३, माहूर १७, वाई २६, वानोळा ७, हिमायतनगर ५८, सरसम ४७, जवळगाव ३५, मुदखेड ७, मुगट ७, बारड ८,भोकर १७, मोघाळी ४५, मातुळ १०, किणी ८, उमरी ८, शिंदी १०, गोलेगाव ९, धर्माबाद ५, जारिकोट १०, करखेली ८, नायगाव ११, बरबडा १७, कुंटूर १०, बिलोली १०, लोहगाव १५, कुंडलवाडी १२, सगरोळी १३, आदमापूर ९, शहापूर ५, हानेगाव ५, जहूर ५, मुक्रमाबाद ९, बाऱ्हाळी ५, कंधार ५, पेठवडज ९, उस्माननगर ९, बारुळ ५, लोहा ९, मालकोळी ११, कलंबर २५, शेवडी २१, सोनखेड ३२, कापशी ५.
परभणी जिल्हा ः परभणी शहर ५, परभणी ग्रामीण ५, सिंगणापूर ६, जांब २५, झरी ३६, जिंतूर १७, बोरी २८, सावंगी म्हाळसा १८, चारठाणा १०, बामणी ३०, सेलू ८, देऊळगाव ५, कुपटा १८, वालूर १७, चिकलठाणा १७, मानवत १९, केकरजवळा १६, कोल्हा १६, पाथरी १२, सोनपेठ ५, पालम ९, पूर्णा ६४, ताडकळस १५, कात्नेश्वर १८, चुडावा १९.
हिंगोली जिल्हा ःहिंगोली १०, खंबाळा ५, माळहिवरा ७, सिरसम ९, बासंबा ३२, नरसी नामदेव ७, डिग्रस १६, कळमनुरी ४२, नांदापूर २१, आखाडा बाळापूर ३६, डोंगरकडा २५, वारंगा फाटा २२, वाकोडी ४५, सेनगाव २५, गोरेगाव ३२, आजेगाव ३१, पाकनेरगाव ९, हत्ता १५, वसमत ३४, हट्टा २२, गिरगाव १९, कुरुंदा ५०, टेंभुर्णी १८, आंबा २४, हयातनगर ३२, औंढानागनाथ ७, जवळा बाजार २८, येळेगाव १३, साळणा १९.


इतर बातम्या
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
वंचितच्या ‘बंद’चा बाजारपेठांवर परिणामअकोला  ः सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
शेतकरी करणार नाना पटोले यांचा सत्कारअकोला  ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्‍न...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
पशुगणना प्रगणकांचे मानधन थकलेसांगली : पशुविभागाकडून जिल्ह्यातील एप्रिल-मे...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...
आवर्तनात पाणीबचत केल्यास सत्कार करणार ः...नगर ः यंदा सर्व धरणे लवकर भरली. परतीचा पाऊसही...
दूधदरवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे परभणीत...परभणी ः मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत...
नांदेड जिल्ह्यात हरभरा पेरणी क्षेत्रात...नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा रब्बी...
अमरावती जिल्ह्यात ओलाव्यानंतरही रब्बीची...अमरावती  ः मॉन्सूनोत्तर पाऊस आणि अवकाळी...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सोलापुरात कांद्यासह सर्व व्यवहार ठप्पसोलापूर : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
चार प्रकल्पातून मराठवाड्यात पावणेतीन...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड,...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...