मराठवाड्यात १७ मंडळांत ५० टक्‍के पेक्षाही कमी पाऊस

मराठवाड्यात १७ मंडळांत ५० टक्‍के पेक्षाही कमी पाऊस
मराठवाड्यात १७ मंडळांत ५० टक्‍के पेक्षाही कमी पाऊस

औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण ४२१ मंडळांपैकी १७ मंडळात अजूनही अपेक्षेच्या ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या धर्मापूरी मंडळात तर अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ २४ टक्‍केच पाऊस झाला आहे.

मराठवाड्यातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस न झालेल्या मंडळांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील चार, जालन्यातील एक, नांदेडमधील तीन, बीडमधील आठ तर उस्मानाबादमधील एका मंडळाचा समावेश आहे. मराठवाड्यातील १६४ मंडळांतच २२ ऑगस्टपर्यंतच्या अहवालानुसार अपेक्षेच्या पुढे जाऊन पाऊस झाला आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १६, जालना, हिंगोलीतील प्रत्येकी १९, परभणीतील १३, बीडमधील १७, लातूरमधील २२ व उस्मानाबादमधील ८ मंडळांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या धर्मापूरी मंडळात २२ ऑगस्टअखेरपर्यंत ४३२ मिलिमीटर पाऊस पडने अपेक्षित होते. प्रत्यक्षात या मंडळात केवळ २४ टक्‍के म्हणजेच केवळ १०४ मिलिमीटरच पाऊस झाला. मंडळात अजूनही अपेक्षेच्या २५ टक्‍केही पाऊस झाला नाही. औरंगाबादमधील विहामांडवा मंडळात अपेक्षेच्या ४७.८० टक्‍के, निल्लोडमध्ये ३९.७९ टक्‍के, बोरगाव बाजार मंडळात ४७.३० टक्‍के, वेरूळ मंडळात अपेक्षेच्या ४९.८६ टक्‍केच पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील धावडा मंडळात अपेक्षेच्या ४३.११ टक्‍के पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्‍यात कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील मरखेल मंडळात ४२.९६ टक्‍के, हनेगाव मंडळात ३२.८७ टक्‍के, मालेगाव मंडळात ३७.२२ टक्‍केच पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील आठ मंडळात अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. त्यामध्ये राजूरीत ३३.७७ टक्‍के, पेंडगाव ४४.४१ टक्‍के, धर्मापूरीत सर्वात कमी २४.०२ टक्‍केच पाऊस झाला.

१३२ मंडळांत ७५ ते १०० टक्‍के पाऊस उस्मानाबाद जिल्ह्यातील अम्बी मंडळात अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ४१.०१ टक्‍केच पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील १३२ मंडळांत अपेक्षेच्या ७५ ते १०० टक्‍के पाऊस झाला आहे. मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंत असलेला पावसाचा जोर बुधवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत ओसरला होता. गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांतही पावसाच जोर ओसरल्याचेच चित्र होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com