agriculture news in marathi, Rain in the 198 circles in Marathwada | Agrowon

मराठवाड्यातील १९८ मंडळांत पाऊस
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 जून 2019

औरंगाबाद  : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील १९८ मंडळात सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. आठही जिल्ह्यांतील सात मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामध्ये लातूर व परभणी जिल्ह्यांतील प्रत्येकी एक, बीड जिल्ह्यातील तीन व उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन मंडळाचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. 

औरंगाबाद  : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील १९८ मंडळात सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. आठही जिल्ह्यांतील सात मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामध्ये लातूर व परभणी जिल्ह्यांतील प्रत्येकी एक, बीड जिल्ह्यातील तीन व उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन मंडळाचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५० मंडळात पाऊस झाला. जिल्ह्यातील गंगापूर, खुल्ताबाद व सिल्लोड तालुक्‍यांत पावसाचा जोर अधिक होता. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २३ मंडळात पाऊस झाला. भोकरदन व घनसावंगी तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक होता. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ५१ मंडळात पावसाने मध्यम, दमदार ते हलकी हजेरी लावली. केज, बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, धारूर तालुक्यांत पावसाचा जोर सर्वाधिक होता.

लातूर जिल्ह्यातील ५३ मंडळांपैकी निलंगा व शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील काही मंडळांचा अपवाद वगळता ४५ मंडळात झालेल्या पावसाचा जोर हलका ते तुरळक स्वरूपाचा होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी २९ मंडळात पावसाची हजेरी लागली. तुलनेने तुळजापूर व उमरगा तालुक्‍यांत पावसाचा जोर अधिक होता. 

मंडळे, पाऊस (मिमीमध्ये)  

औरंगाबाद लाडसावंगी २४, गोळेगाव ५५ , अजिंठा २२, सोयगाव ३०, सिद्‌धनाथवडगाव २३, हर्सूल २८, डोणगाव २५, वेरूळ २०, बाजारसावंगी २५
जालना भोकरदन २५ , सिपोरा बाजार ४५, धावडा २९, पिंपळगाव रेणूकाई ४२, हस्नाबाद २०, अन्वा ४२,तिर्थपूरी ३२, अंतरवली टेंबी २१
बीड बीड ४०, पेंडगाव ३७, मांजरसुंभा ३७ चौसाळा ४०, नाळवंडी २१, पाली ३७, म्हळसजवळा २०, थेरला ३०, अमळनेर ३०, दासखेड ४०, आष्टी ३९, कडा ३०, धामणगाव ४७, गेवराई ४२, धोंडराई २७,  शिरूर कासार ३९, दिंद्रूड ५०, विडा ३२, नांदूरघाट २७, धारूर ३२
लातूर हेर ४१, देवर्जन ३१, नागलगाव ३१, निलंगा ३७, कासार शिरस्ती ४१, मदनसुरी ३४, कासार बालकुंदा ३२, वलांडी २२, बोरोळ २०, शिरूर अनंतपाळ ३०, हिसामाबाद ५४, साकोळ ४०
उस्मानाबाद नळदूर्ग २७, उमरगा ५०, मुरूम ३४, मुळज ६४, इटकूर ६४, पारगाव २३, अनाळा ५०

६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची मंडळे

सेलू ७५
केज  ६७ 
हनुमंत पिंपरी  ६५ 
होळ ६८ 
उदगीर ८०
जळकोट ७५
वाशी ११४

 

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...