मराठवाड्यातील २३ तालुक्यांत पावसाची हलकी हजेरी

 नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २३ तालुक्यांत पावसाची  हजेरी
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २३ तालुक्यांत पावसाची हजेरी

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २३ तालुक्यांत शुक्रवारी (ता. २८) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील पूर्णा मंडळात (७८ मिमी) अतिवृष्टी झाली. चांगला पाऊस झालेल्या भागातील शेतकऱ्यांनी कपाशी, हळद लागवड सुरू केली आहे. दररोजचा पाऊस कपाशीची उगवण होण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याची माहिती मिळाली. 

नांदेडमधील  मुदखेड, उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली, देगलूर, लोहा, किनवट, माहूर येथे पाऊस झाला. परभणीतील  परभणी, पू्र्णा, गंगाखेड, पाथरी, मानवत, जिंतूर, हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यात पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मि.मी.) 

नांदेड जिल्हा दहेली (५), उमरी (१२), गोलेगाव (३०), धर्माबाद (१७), करखेली १२), मुखेड (२०), बाऱ्हाळी (५), कुंटूर (५), शेवडी (२०), कापसी (१२), माहूर (११), वाई (१८),  सिंदखेड (८), बारड (३८), मुदखेड (१३), तळणी (१७).
परभणी जिल्हा परभणी शहर (७), परभणी ग्रामीण (५), झरी (३९), पेडगाव (४५), जांब (६), पूर्णा (७८), ताडकळस (१३), चुडावा (९), कात्नेश्वर (१३), पाथरी (२३), मानवत (३७), कोल्हा (२५).
हिंगोली जिल्हा नांदापूर (८), डोंगरकडा (५), वारंगा फाटा (५), गोरेगाव (२७), कुरुंदा (६), आंबा (१०), हयातनगर (५), औंढानागनाथ (१८), जवळा बाजार (१५), येळेगाव (२८), साळणा (१२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com