परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांत पाऊस

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांमध्ये सोमवारी (ता. १४) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली.
Rain in 74 circles in Parbhani, Hingoli district
Rain in 74 circles in Parbhani, Hingoli district

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ७४ मंडळांमध्ये सोमवारी (ता. १४) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. मुळधार पावसामुळे ओढे, नद्यांना पूर आले. जमिनीतील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

रविवारी (ता. १) रात्री १० पासून परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळात पाऊस सुरू झाला. परभणी जिल्ह्यातील ५१ पैकी ४६ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, पालम,जिंतूर, सेलू, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडळांत जोरदार पाऊस झाला. दूधना, पूर्णा या नद्यांना पूर आले. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी २८ मंडळांत पावसाने हजेरी लावली. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ तालुक्यातील मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे ओढे, नाले, नद्यांना पूर आले.

मंडळनिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)  परभणी जिल्हा ः परभणी ७७.५, पेडगाव ४२.५, जांब  २१.३, पिंगळी ३१.१, दैठणा ४५.३, सिंगणापूर ३१.१, झरी ३१.१, जिंतूर २०.५, सावंगी म्हाळसा २४.३, बामणी १४.५, वाघी धानोरा २१, दुधगाव २४.५, सेलू १३.५, वालूर ६०, कुपटा ५३, ताडबोरगाव ३८.९, गंगाखेड ५५, राणीसावरगाव ४६.५, पिंपळदरी १२.८, चाटोरी २४.८, बनवस ५२, पेठशिवणी ३६.३, रावराजूर ३६.३, पूर्णा १७.३, ताडकळस १४, लिमला १४.७, कात्नेश्वर ८.८, चुडावा १९.५, कावलगाव १३.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली १८.५, डिग्रस कऱ्हाळे ३८.८, खंबाळा ११.५, वारंगा २५.५, वसमत ३४.५, हयातनगर १८.१, गिरगाव १३.५, टेंभुर्णी ४१.८, कुरुंदा १२.५, औंढानागनाथ २७.३, येळेगाव ४५.३, साळणा १८.३, जवळा बाजार २४, सेनगाव १२, आजेगाव २४, हत्ता ११.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com