मराठवाड्यात ८७ मंडळांत पाऊस

मराठवाड्यात ८७ मंडळांत पाऊस
मराठवाड्यात ८७ मंडळांत पाऊस

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी ८७ मंडळात मंगळवारी (ता. ११) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. अपवाद वगळता इतर मंडळात तुरळक ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाल्याची नोंद आहे. 

तीन दिवसांपासून मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागणे सुरू आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत बीड जिल्ह्यातील २४ मंडळात, औरंगाबाद जिल्ह्यातील २०, लातूरमधील १२, जालन्यातील ११, परभणीमधील ७, हिंगोलीतील ५, नांदेडमधील ६, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील २ मंडळात तुरळक ते हलका स्वरूपाचा पाऊस झाला. बीड, औरंगाबाद, परभणी जिल्ह्यांतील काही मंडळात पावसाचा जोर तुलनेने अधिक राहिला. 

बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा मंडळात २ मिलिमिटर, लिंबागणेश ४, पाटोदा २६, अमळनेर ३, दासखेड ३३, आष्टी ६, कडा ४, धामनगाव ३४, दौलावडगाव १७, पिंपळा २, धानोरा ३, धोंडराई ४, उमापूर ५, शिरूर कासार ९, माजलगाव ३, दिंद्रुड ३, केज ७, हनुमंतपिंप्री २, होळ ५, परळी ६, सिरसाळा ६, नागापूर ४, धर्मापूरी ११, पिंपळगाव गाढे मंडळात १० मिलिमिटर पाऊस झाला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद मंडळात १८ मिलिमिटर, उस्मानपूरा ६, चित्तेपिंपळगाव ५, लाडसावंगी १४, हर्सूल ५, वैजापूर २०, शिवूर १६, खंडाळा ९, महालगाव १७, लाडगाव ३, नागमठान १८, लोणी १८, बोरसर ३,  बालानगर ४, पाचोड १, गंगापूर १६, मांजरी ३, सिद्धनाथ वडगाव १३, भेनडला १४, देवगाव रंगारी येथे ३ मिलिमिटर पाऊस झाला. 

जालना जिल्ह्यातील जालना मंडळात १ मिलीमिटर, वाग्रुळ जहांगीर २, बदनापूर ६, रोशनगाव १, सेलगाव ४, दाभाडी २, टेंभूर्णी ९, श्रीष्टी २, वाटूर ७, अंबड ४, सुखापूरी मंडळात २ मिलिमीटर पावसाने हजेरी लावली. परभणीतील पालम मंडळात १ मिलिमिटर, चारोटी ११, बनवस ११, राणिसावरगाव २५, माखणी ३, सोनपेठ ८, केकरजवळा ४ मिलिमिटर, लातूर जिल्ह्यातील किल्लारी मंडळात १ मिलिमिटर, अहमदपूर ४, किनगाव २, खंडाळी २१, हाडोळती ४, अंधोरी २५, जळकोट २, निलंगा ३०, अंबूलगा बु. १६, औराद श. २, देवणी बु. ४, मिलिमिटर, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील नारगवाडी २, तर इटकूर मंडळात १२ मिलिमिटर पाऊस झाला. 

हिंगोली, नांदेड, परभणीत बरसला

हिंगोली जिल्ह्यातील माणहिवरा मंडळात १४ मिलिमिटर, सिरसम बु. ६, कळमनुरी ९, सेनगाव २, गोरगाव ६, तर नांदेड जिल्ह्यातील सोनखेड मंडळात ६ मिलिमिटर, इस्लापूर २, देहेली १,  माहूर ७, सिंदखेड १, चांडोळ २ मिलिमिटर पाऊस झाला. 

ज्येष्ठ महिलेसह चार शेळ्या ठार

भालगाव (ता. गंगापूर) शिवारात सोमवारी (ता. १०) विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या वेळी वीज पडून चार शेळ्या दगावल्या. त्यामुळे दादा अमीर शहा यांना मोठा आर्थिक फटका बसला. लिंबाच्या झाडाखाली उभ्या शेळ्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्या दगावल्या. फूलंब्री तालुक्‍यातील खामखेडा येथे शेतात वीज पडून ज्येष्ठ महिला ठार झाली. तर एक महिला जखमी झाली. ही घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. फुलंब्री पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली. गंगूबाई चतूर भगुरे (वय ६५, रा. फुलंब्री) मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रेणुका ज्ञानेश्वर बंगारे (वय २४, रा. खामखेडा) या जखमी झाल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com