बीडमधील ४९ मंडळांत पाऊस बरसला

बीडमधील ४९ मंडळांत पाऊस बरसला
बीडमधील ४९ मंडळांत पाऊस बरसला

बीड /लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांतील २७२  मंडळांपैकी ११३ मंडळांत मंगळवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची हजेरी लागली. आजवर कायम पावसाची अवकृपा झेलणाऱ्या बीड जिल्ह्यावर विशेष कृपा केली. जिल्ह्यातील ४९ मंडळांवर पाऊस कमालीचा मेहरबान झाला. त्यापैकी पाच मंडळांत ६७ ते १४० मिलिमीटरदरम्यान पावसाची नोंद झाली. 

बीड जिल्ह्यावर सोमवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांपर्यंत पावसाची अवकृपा कायम होती. मंगळवारी सकाळपर्यंतच्या जिल्ह्यातील ४९ मंडळांत सरासरी पाऊस ५० टक्‍क्‍यांच्या आत होता. या पावसाने हा टक्‍का ५० च्या पुढे नेण्यास मदत केली. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ४९ मंडळांत हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. सर्वाधिक १४० मिलिमीटर पावसाची नोंद बीड मंडळात झाली. त्यापाठोपाठ पेंडगाव मंडळांत ११५, पाली ११०, कौडगाव बु. ९५, तर दौलावडगाव मंडळात ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड, वडवणी तालुक्‍यांत झालेल्या अतिजोरदार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले. बिंदूसरेलाही पाणी आले होते. आष्टी शिरूर कासार, माजलगाव, परळी तालुक्‍यांत हलका मध्यम ते दमदार पाऊस झाला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ९ मंडळांत हलका ते मध्यम, जालनामधील ४९ पैकी २ मंडळांत हलका पाऊस झाला. जालना, बदनापूर, जाफ्राबाद, परतूर, मंठा, अंबड तालुक्‍यांकडे पावसाची पाठ होती. लातूरमधील ५३ पैकी ३० मंडळांत हलका, मध्यम ते दमदार, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी २३ मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला.   

जिल्हानिहाय पावसाची मंडळे (मि.मी)

 औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद २४, उस्मानपुरा २७, चिकलठाणा ३६, अंबाई १४, पिशोर २०, करंजखेडा ४८, चिंचोली लिंबाजी १८.
जालना जिल्हा पिंपळगाव रेणुकाई १५, झरी बु.२५
बीड जिल्हा बीड १४०, राजुरी ११५, मांजरसुंभा १५, नाळवंडी ५३, पिंपळनेर ४०, पाली ११०, म्हळसजवळा ४५, अमळनेर २०, धामणगाव ४३, दौलावडगाव ६७, पिंपळा २६, शिरूर कासार २४, राहमोहा १८, तिंतरवणी २२, वडवणी ५२, कौडगाव बु. ९५, माजलगाव २०, तालखेडा ५०, हनुमंत पिंप्री ४०, नांदूरघाट १७, धर्मापुरी ३८
 लातूर जिल्हा कासारखेडा ४२, गातेगाव ४०, हरंगुळ बु. २२, चिंचोली ब. ४६, रेणापूर १५, किनगाव १८, निलंगा ३१, अंबूलगा बु. १७, मदनसुरी ५२, औराद श. ३२, शिरूर अनंतपाळ ४०
उस्मानाबाद जिल्हा जागजी ३०, जळकोट १४, नळदुर्ग १४, सालगरा २३, इटकळ २०, नारगवाडी १६, डाळिंब १३, वाशी ३३, परंडा ३५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com