कोकणाला दणका, मराठवाड्यात दिलासा

मुंबईसह कोकणला पावासाने चांगलेच झोडपून काढले. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गुरूवारी (ता.६) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात कुलाबा येथे ३३१.८ मिलिमीटर पाऊस झाला.
yeldari
yeldari

पुणे: मुंबईसह कोकणला पावासाने चांगलेच झोडपून काढले. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गुरूवारी (ता.६) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात कुलाबा येथे ३३१.८ मिलिमीटर पाऊस झाला. वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. कोकणात पावसामुळे शेतीला फटका बसला मात्र मराठवाडा आणि विदर्भात हा पाऊस पिकांसाठी वरदान ठरला. 

कोकणातील मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यांत तीन ते चार दिवसापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तिलारी (ता.दोडामार्ग), कर्ली (ता. कुडाळ), वाघोटन (ता. देवगड) या तीन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. दोडामार्ग आणि वैभववाडी या तालुक्यांना तर पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. खारेपाटण (ता.कणकवली) शहराला पुराच्या पाण्याने वेढा दिला. येथील अनेक घरे, दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसून नुकसान झाले. कुडाळ तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या दहा नागरिकांना सुरक्षित स्थळी हालविले. ३५ हुन अधिक घरे आणि गोठ्यांचे नुकसान झाले.  रत्नागिरीमध्येही अधूनमधून जोरदार सारी कोसळत आहेत. या पावसामुळे मंडणगड मधील भारजा, खेडच्या जगबुडी नदीला, चिपळुणात वाशिष्ठी, नारिंगी, संगमेश्वरला बावनदी, रत्नागिरीत काजळी तर राजापूरला अर्जुना नदीला पूर आला होता. किनारी भागात भातशेती सलग दोन दिवस पाण्याखाली होती. रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी, संगमेश्वर मधील फुणगुस, निवळी येथे शेतीचे नुकसान झाले आहे. पावसामुळं रत्नागिरी तालुक्यातील कळझोडी गणसुरे वाडीकडे जाणारा पुलाचा एक पिलर पूर्णतः कोसळला आहे. त्यामुळे दोन वाड्यांचा संपर्क तुटला आहे. संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव, निळवेवाडी, कर्ले, देवळे गावात घरांचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  मध्य महाराष्ट्रात जोर कायम  मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात राधानगरी येथे २३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. साताऱ्यातील धरण क्षेत्रातील कोयना, नवजा व महाबळेश्वर येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, नाशिक खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या भागात हलक्या पावसाच्या हजेरीने शेतकरी सुखावले आहेत. 

मराठवाड्याला दिलासा  मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, हिंगोली,लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यातील मंडळात तुरळक, हलका पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील दोन मंडळात अतिवृष्टी झाली तर औरंगाबाद  जिल्ह्यातील पैठण तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. नांदेड जिल्ह्यातील बहुतांशी मंडळात तुरळक हलका पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील सातोना मंडळात ७१.३ मिलिमीटर तर सुखापुरी मंडळात सर्वाधिक १२३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरिपातील पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. 

विदर्भात हलक्या सरी  विदर्भातील बहुतांशी भागात पावसाने चांगली हजेरी लावली. अकोला वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. तर अमरावतीतील नांदगाव काझी, वरूड, भंडाऱ्यातील लाखंदूर, लाखणी, मोहाडी, पवनी, तुमसर, बुलडाण्यातील संग्रामपूर, चंद्रपूरमधील सिंदेवाही, गडचिरोलीचील मुलचेरा, सिरोंचा, गोंदियातील आमगाव, सडकअर्जुनी, सालकेसा, तिरोडा येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर गोरेगाव येथे १४८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. नागपूरातील हिंगण, कळमेश्वर, कामठी, कुही, नागपूर, नरखेडा, पारशिवणी, रामटेक अशा काही ठिकाणी मध्यम तर अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. 

मराठवाडा, विदर्भात दिलासा 

  • कोकणातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत 
  • कुडाळ तालुक्यात ३५ हून अधिक घरांचे नुकसान 
  • रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पिकांचे नुकसान 
  • मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम 
  • पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात संततधार सुरुच 
  • अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे ऊस पीक आडवे झाले 
  • मराठवाड्यातील खरिपाला पावसाने दिलासा 
  • विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी 
  • राज्यात २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली ठिकाणे  कुलाबा ३३१.८, पालघर २२५८.८, भिरा २८९, माणगाव २२२, माथेरान २४१.२, म्हसळा २००, मुरूड २११, पनवेल २१७, पेण २२०, रोहा ३०४, श्रीवर्धन २३८, सुधागडपाली २११, तळा २३७, उरण ३२३, मंडणगड २२८, गगणबावडा २१४, राधानगरी २३४, शिरगाव २८०, आंबोणे २६५, डुंगरवाडी २८३, दावडी २६५, कोयना (नवजा) ३००, ताम्हिनी ३२५, तुलसी २१६. 

    गुरूवारी (ता.६) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मि.मी.मध्ये)  कोकण : सांताक्रुझ १६२.३, डहाणू ८८.६, वसई ६५, विक्रमगड ४१, वाडा १३४, अलिबाग १६८.४, कर्जत १०७.६, खालापूर ९०, महाड १८१, पोलादपूर १८२, चिपळूण १२३, दापोली १७०, गुहागर ८८, हर्णे १४४.४, खेड ११४, लांजा ९५,राजापूर ९३, रत्नागिरी ५६.७, संगमेश्वर ९२, देवगड ४२, दोडामार्ग १२६, कणकवली ९७, कुडाळ ५५, मालवण ६३, सावंतवाडी ७०, वैभववाडी १०८, वेंगुर्ला ३६.२, अंबरनाथ ७०.६, भिवंडी ११५, कल्याण १२५, शहापूर ४५, ठाणे १७९, उल्हासनगर ११९,  मध्य महाराष्ट्र : अकोले ३४, कोपरगाव ३३, गिधाडे ३७.२, शिरपूर ७५, आजरा १७८, चंदगड १७१, गडहिंग्लज ९२, गारगोटी ७५, हातकणंगले ६७, कागल ११७, करवीर १०८.५, पन्हाळा ११६, शाहूवाडी ८८, शिरोळ ५५, नंदुरबार ३३, तळोदा ५५, दिंडोरी ७७, इगतपुरी ४६, मालेगाव ३१,  निफाड ५७.७, पेठ ४६.२, भोर ६८, लोणावळा कृषी १६१, पौड ७०, वेल्हे १३४, कराड ३३, महाबळेश्वर १८७.२, पाटण ६०,  मराठवाडा : जालना : अंबड ३३, घनसांगवी २०, जाफ्राबाद २०.  विदर्भ : भंडारा ३३, लाखंदूर ४१.६, मोहाडी ३०.४,तुमसर ३०, आमगाव १२२.२, गोंदिया ६२.४, गोरेगाव १४८, सालकेसा ३५.३, हिंगणा ४०.४, कळमेश्वर ३४.६, कामठी ३७.९,नागपूर ४७.२, पारशिवणी ७१.५, रामटेक ६३.५, सावनेर ५८.९, उमरेड ४४.७.  घाटमाथा ः लोणावळा (टाटा) १७४, लोणावळा (ऑफीस) १४५, वाळवण १११, खोपोली १३६, खांड ५३, वैतरणा ४१, तानसा ७६, विहार १६४, भातसा ५६  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com