Agriculture news in marathi, Rain again in Mahur, Kinwat, Hadgaon | Agrowon

किनवट, हदगाव, माहूरमध्ये पुन्हा पाऊस

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

नांदेड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गुरुवारी (ता. २३) नांदेड तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानंतर शुक्रवारी (ता. २४) किनवट, माहूर, नांदेड व हदगाव तालुक्यांत पाऊस झाला.

नांदेड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गुरुवारी (ता. २३) नांदेड तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानंतर शुक्रवारी (ता. २४) किनवट, माहूर, नांदेड व हदगाव तालुक्यांत पाऊस झाला. यासोबतच मुखेड, अर्धापूर, कंधार, धर्माबाद, नायगाव, मुदखेड तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली. शनिवारी (ता. २५) सकाळी साडेदहा वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात मागील सोमवारपासून पावसाची संततधार चालू आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना बाधा पोहोचत आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या पावसाचा मुक्काम वाढल्याने शेतकरी धास्तावले आहेत. शुक्रवारी किनवट, माहूर, नांदेड व हदगाव तालुक्यांत चांगला पाऊस झाला.

यासोबतच मुखेड, अर्धापूर, कंधार, धर्माबाद, नायगाव, मुदखेड तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली. शुक्रवारचा पाऊस जांब मंडलात ५५ मिलिमीटर झाला. तर तामसा ५१, वसरणी ३९, वाजेगाव ३३, आष्टी २९, दहेली २८, वाई २७, माहूर २०, निवघा १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चोवीस तासांत सरासरी ७.३० मिलिमीटर झाला. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या १०३४ मिलिमीटरनुसार ११६.५७ टक्के पावसाची नोंद झाली.

तालुकानिहाय पाऊस

नांदेड १३, बिलोली ०.६०, मुखेड ११.९०, कंधार ५.२०, लोहा ३.८०, हदगाव १८, भोकर ३, देगलूर ०.८०, किनवट ११.५०, मुदखेड ३.४०, हिमायतनगर ३.४०, माहूर १४.५०, धर्माबाद ६.३०, उमरी १.४०, अर्धापूर ५.४०, नायगाव ६.


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...