Agriculture news in marathi, Rain again in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात २७१ मंडळांमध्ये बरसला पाऊस

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील २७१ मंडळांमध्ये शनिवार (ता. २१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ७, परभणी जिल्ह्यातील ४ मंडळांमध्ये जोरदार वृष्टी झाली. नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

औरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील २७१ मंडळांमध्ये शनिवार (ता. २१) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ७, परभणी जिल्ह्यातील ४ मंडळांमध्ये जोरदार वृष्टी झाली. नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ४९ मंडळांमध्ये, जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४० मंडळांमध्ये हलका ते मध्यम, परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी ३६ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये चांगला पाऊस झाला. पाथरी, मानवत, देऊळगाव, हदगाव मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. येथील ओढे, नाले भरून वाहिले. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ३० मंडळांमध्ये पाऊस झाला.

 नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी ७९ मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर, नायगाव, कंधार, धर्माबाद, देगलूर, मुखेड लोहा, किनवट, माहूर तालुक्यांतही पाऊस बरसला. मुगट, निवघा, दहेली, मोगाली, सिंदी, करखेली, सोनखेड या सात मंडळांमध्ये जोरदार वृष्टी झाली.

मंडळनिहाय पाऊस (२० मि.मीच्या पुढे)  ः 

औरंगाबाद जिल्हा भावसिंगपुरा २३, लाडसावंगी ३०, हर्सुल २५, अमठाणा २७, बोरगाव बाजार २५, वैजापूर ३०, चिंचोली लिंबाजी ३२.
जालना जिल्हा दाभाडी ३०, हस्नाबाद २०, आष्टी ४५, गोंदी २६, घनसावंगी ३२, राणी उंचेगाव ४७.
परभणी जिल्हा पिंगळी २८, सावंगी म्हाळसा ४४, बोरी २५, सेलू ३५, देऊळगाव ६५, कुपटा २३, मानवत ६७, कोल्हा ४७, पाथरी १०५, हदगाव ६५, चुडावा २४, कात्नेश्वर ३५.
हिंगोली जिल्हा हिंगोली ४६, खंबाळा ३९, माळहिवरा ५२, सिरसम ६२, बासंबा २६, कळमनुरी ४२, नांदापूर २१, वारंगा फाटा २३, सेनगाव ३०, गोरेगाव ३८, आजेगाव ५५, पानकनेरगाव ३३, वसमत २५, हट्टा २९, गिरगाव २८, कुरुंदा ३५, हयातनगर २७, येळेगाव ४१, साळणा २१.
नांदेड जिल्हा नांदेड शहर २८, नांदेड ग्रामीण ४५, तुप्पा ३५, विष्णुपुरी ३९, वसरणी ५३, वजीराबाद ३६, तरोडा २६, लिंबगाव २६, मुदखेड ३६, मुगट ८०, बारड ३५, अर्धापूर ३२, मालेगाव २२, हदगाव ५५ , मनाठा ३५, पिंपरखेड २१, निवघा ८३, तळणी ४१, आष्टी ३५, मांडवी ५९, बोधडी २२, दहेली ६९, वाई ५९, सिंदखेड २७, जवळगाव २४, भोकर ३८, किनी ४६, मोगाली ८५, मातुल ६४, उमरी ३९, सिंदी ९५, गोळेगाव ४९, धर्माबाद ३९, जारिकोट ३३, करखेली ८९, नायगाव २२, नरसी ३३, मांजरम २९, बरबडा १८, कुंटूर ३४, बिलोली ४८, आदमपूर ३६, लोहगाव ४४, सगरोळी २२, कुंडलवाडी ४०, देगलूर ३८, शहापूर २०, मुखेड ३०, येवती ५०, जाहूर ६२, चांदोला ३२, कंधार ४०, कुरुला ४२, बारुळ २७, पेठवडज ६०, फुलवळ ३५, माळाकोळी ४७, शेवडी ३१, सोनखेड ७२, कापसी २४.
बीड जिल्हा जातेगाव २५, गंगामसला ३५, तालखेड २७, किट्टी आडगाव ३७

 


इतर बातम्या
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
गाव करतेय गवतांचे संवर्धन शाश्वत प्रगतीच्या मार्गावर निघालेले...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...