नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाची पुन्हा हजेरी

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाची पुन्हा हजेरी
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाची पुन्हा हजेरी

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १४९ मंडळांत गुरुवारी (ता. ८) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील पेठवडज मंडळामध्ये सर्वाधिक ८७ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८० मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. कंधार, लोहा, बिलोली, उमरी, धर्माबाद, देगलूर, नायगाव, मुदखेड तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. लोहा तालुक्यातील सोनखेड ७२ मिलिमीटर, कंधार तालुक्यातील कंधार मंडळात ७१, फुलवळ ६५, पेठवडज ८७, कुरुला ६६, बिलोली तालुक्यातील सगरोळी मंडळात ७२ मिलिमीटर, आदमपूर ६८, तर मुखेड तालुक्यातील मुखेड मंडळात ६८ मिलिमीटर पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ३९ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडळांत पावसाचा जोर राहिला. सेलू तालुक्यातील देऊळगाव मंडळात सर्वाधिक ४८ मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ३० मंडळांत हलका ते मध्यम पाऊस झाला. गोरेगाव (ता. सेनगाव) मंडळात सर्वाधिक २६ मिलिमीटर पाऊस झाला.

मंडळनिहाय पाऊस (मिमी) 

नांदेड जिल्हा नांदेड १३, नांदेड ग्रामीण २३, वजीराबाद २३, वसरणी २१, तरोडा ३०, लिंबगाव १३, तुप्पा २०, विष्णुपुरी २०, अर्धापूर ५, मालेगाव ८, दाभड १६, मुदखेड ३०, मुगट २८, बारड १४, हदगाव ५, तामसा ५, मनाठा ७, पिंपरखेड १०, आष्टी ४, निवघा १२, तळणी ९, माहूर १६, वाई १८, वानोळा १३, सिंदखेड १९, किनवट २६, इस्लापूर १२, मांडवी १५, बोधडी २०, जलधारा १२, शिवणी ५, हिमायतनगर ५, सरसम ४, जवळगाव २, भोकर ८, किनी ६, मोघाली १५, मातुल १०, उमरी ३०, सिंदी २८, गोलेगाव ४०, धर्माबाद २३, जारिकोट ३१, करखेली ३८, नायगाव ५८, नरसी ४९, मांजरम २७, बरबडा ४२, कुंटूर ३५, बिलोली ४६, कुंडलवाडी ४२, सगरोळी ७२, आदमपूर ६८, लोहगाव ५६, देगलूर ४३, खानापूर ४४, शहापूर ४३, मरखेल २०, मालेगाव २६, हानेगाव ७, मुखेड ६८, जांब ४५, येवती ६२, जाहूर २६, मुक्रमाबाद १६, बाऱ्हाळी ३४, कंधार ७१, फुलवल ६५, उस्माननगर ४१, बारुळ ६०, पेठवडज ८७, कुरुला ६६, लोहा ३८, माळाकोळी ६२, कलंबर ३०, शेवडी ५४, सोनखेड ७२, कापसी ६२.
परभणी जिल्हा परभणी ७, परभणी ग्रामीण ६, सिंगणापूर २०, दैठणा २५, पेडगाव ८, पिंगळी ९, जांब १२, झरी २५, बोरी ९ , चारठाणा ५, बामणी ८, सावंगी म्हाळसा ५, आडगाव ५, सेलू २२, देऊळगाव ४८, कुपटा १५, वालूर १६, चिकलठाणा १२, मानवत ३९, केकरजवळा २५,  कोल्हा १३, पाथरी २५, बाभळगाव १७, हदगाव २१, सोनपेठ २५, आवलगाव २५, गंगाखेड ४०, राणीसावरगाव ३२, माखणी २६, महातपुरी ३२, पालम ४२, चाटोरी २९, बनवस ३५, पूर्णा २१, ताडकळस ३१, चुडावा २४, लिमला २२, कात्नेश्वर १६.
हिंगोली जिल्हा हिंगोली ५, माळहिवरा २०, सिरसम १२, बासंबा १२, डिग्रस ७, कळमनुरी १०, नांदापूर १०, आखाडा बाळापूर ७, डोंगरकडा १२, वारंगा फाटा ६, वाकोडी १३, वसमत ९, हट्टा १५, गिरगाव ५, कुरुंदा १२, हयातनगर १३, औंढा नागनाथ ६, येळेगाव ८, गोरेगाव २६, आजेगाव १९, पानकनेरगाव १२, हत्ता ७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com