पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; पेरणीला सुरवात

पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; पेरणीला सुरवात
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; पेरणीला सुरवात

पुणे ः मॉन्सूनच्या पावसाने पुणे जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, गुरुवारी व शुक्रवारी दिवसभर सर्वदूर पाऊस झाला. मुळशी तालुक्यातील माले येथे ५३.५ मिलिमीटर तर पुणे शहरामध्ये ५२.८ मिलिमीटर पावसाची नोंद शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झाली. यामुळे ओढे, नाले भरून वाहू लागले असून, शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली असून खते, बियाणे खरेदीसाठी गर्दी होत आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. गुरुवारीही दुपारनंतर जोरदार पाऊस पडला. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, ग्रामीण भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. खेडमधील वाडा, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, शिरूरमधील तळेगाव, दौंडमधील राहू या ठिकाणी पावसाने हजेरी लावली नसली तरी हवामान ढगाळ होते.

हवेली तालुक्यातील पुणे शहर, हडपसर या ठिकाणी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे या भागातील वाहतूक विस्कळित झाली. तर खडकवासला परिसरात हलका पाऊस पडल्याने भात रोपवाटिकेची कामे वेगाने सुरू झाली आहेत. भोर, मुळशी, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यांतही पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसामुळे भात उत्पादक शेतकरी सुखावला असून, गेल्या आठ दिवसांपूर्वी रोपवाटिकेत टाकलेली भात बियाणे उगवून आल्याने चांगलीच तरारली आहेत. पूर्व पट्ट्यातील शिरूर, बारामती, दौंड, पुरंदर, इंदापूर तालुक्यांतही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पुरंदरमधील राजेवाडी, दौंडमधील केडगाव, इंदापुरातील लोणी, बारामतीतील उंडवडी या भागातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. 

मंडळनिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये ः  हवेली - पुणे शहर ५२.८, कोथरूड २०.८, खडकवासला ९.५, थेऊर ७.०, उरुळीकांचन ८.३, खेड २०.०, भोसरी १.८, चिंचवड ०.५, कळस १.८, हडपसर ४५.३, वाघोली १.८. मुळशी - पौड १९.३, घोटावडे २०.५, थेरगाव ४९.५, माले ५३.५, मुठे ४३.०, पिरंगुट २५.८. भोर - भोर ३०.८, भोलावडे ४९.८, नसरापूर ३१.८, किकवी २४.८, वेळू १७.८, आंबवडे ३१.५, संगमनेर ३४.५, निगुडघर ३१.०. मावळ - वडगाव मावळ १.५, तळेगाव ७.८, काले ३.०, कार्ला ९.०, खडकाळा ४.५, लोणावळा २१.८, शिवणे ११.५. वेल्हा - वेल्हा ३५.०, पानशेत ३६.०, विंझर ४३.३, अंबावणे ४४.८, जुन्नर - जुन्नर ३.०, नारायणगाव ७.८, वडगाव २.०, निमगाव सावा २.८, बेल्हा ६.५, राजूर ६.८, डिंगोरे ५४.५, आपटाळे ५.३, ओतूर २८.३. खेड - राजगुरुनगर ०.३, कुडे ७.३, पाईट १.५, चाकण ०.३, कडूस ०.३, आंबेगाव - घोडेगाव २१.८. आंबेगाव ३५.८, कळंब १७.३, पारगाव १.०, मंचर ५१.०, शिरूर - टाकळी ३३.०, वडगाव २.५, न्हावरा , मलठण २६.८,  रांजणगाव ०.३, कोरेगाव १.०, पाबळ ११.८, शिरूर १३.५. बारामती - बारामती ९.५, माळेगाव १३.५, पणदरे ७.३, वडगाव ७.५, लोणी १६.८, सुपा १.८, मोरगाव ४.५, उंडवडी ४८.०. इंदापूर - भिगवण ९.०, इंदापूर १२.८, लोणी २०.०, बावडा ८.०, काटी ८.८, निमगाव ७.३, अंथुर्णी १२.३, सणसर ९.५. दौंड - देऊळगाव ४.०, पाटस ४.८, यवत ३.३, केडगाव २१.०, राहू, वरवंड १३.८, रावणगाव १७.३. पुरंदर - सासवड ९.३, भिवंडी १६.८, कुंभारवळण १५.०, जेजुरी ८.३, परिंचे १४.८, राजेवाडी ३९.५, वाल्हा १३.८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com