agriculture news in Marathi, rain in all state, Maharashtra | Agrowon

राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 जून 2019

पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर पावसाला सुरवात झाली आहे. शनिवारपासून आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ होताच पावसाच्या सरींनी जोर धरल्याने खरिपाच्या अशा पल्लवित झाल्याने पेरण्यांना वेग येणार आहे. सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील वेंगुर्ला येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पाऊस झाला, मध्य महाराष्ट्रातील शिरपूर (जि. धुळे) येथे ११० मिलिमीटर, मराठवाड्यातील वाशी (जि. उस्मानाबाद) येथे ११० मिमी आणि उदगीर येथे ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  

पुणे : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यानंतर सर्वदूर पावसाला सुरवात झाली आहे. शनिवारपासून आर्द्रा नक्षत्राला प्रारंभ होताच पावसाच्या सरींनी जोर धरल्याने खरिपाच्या अशा पल्लवित झाल्याने पेरण्यांना वेग येणार आहे. सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील वेंगुर्ला येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पाऊस झाला, मध्य महाराष्ट्रातील शिरपूर (जि. धुळे) येथे ११० मिलिमीटर, मराठवाड्यातील वाशी (जि. उस्मानाबाद) येथे ११० मिमी आणि उदगीर येथे ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  

सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. शिराळा, वाळवा, कडेगाव, तासगाव तालुक्यांत जोरदार; तर पलूस, खानापूर, कवठे महांकाळ, जत, आटपाडी तालुक्यांत तुरळक पाऊस पडला. पावसामुळे भुईमूग, सोयाबीन आदी पेरण्यांना गती येण्याची चिन्हे आहेत. दुष्काळाने होरपळत असलेल्या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले आहे.

सातारा शहरासह शाहूपुरी, संभाजीनगर, गोडोली, कोडोली, खेड, माहुली, शेंद्रे, नागठाणे परिसराला पावसाने झोडपून काढले. पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, पेरणीपूर्व व पेरणीच्या कामांना वेग येणार आहे.  कोरडवाहू पट्ट्यातील बारामती, शिरूर, इंदापूर, दौंडसह, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात रविवारी (ता. २३) दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसानंतर वाफसा मिळताच खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे.

बुलडाणा, नांदुरा, मोताळ्यातील काही भागात दमदार पाऊस... पहा Video

पावसामुळे ऊस, टोमॅटो, भाजीपाल्यासह उन्हाळी पिकांना जीवदान मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, माळशिरस तालुक्‍यांमध्ये पावसाला सुरवात झाली. नगर जिल्ह्यात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव, शेवगाव तालुक्यातील बोधेगाव मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. पश्चिम भागातील अकोले तालुक्यात मात्र अजूनही पाऊस सुरू झालेला नाही, खानदेशातील धुळे जिल्ह्यासह जळगाव, नंदुरबारात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी झालेल्या भागात पावसामुळे दिलासा मिळला आहे. 

मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील उस्मानपुरा, फुलंब्री, वडोदबाजार, नागमठाण येथे दमदार पाऊस झाला. नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कमी होता. शिरूर कासार तालुक्‍यातील वारणी (जि. बीड) येथील नागनाथ सेवाभावी संस्थाच्या छावणीत वीज पडून दोन म्हशी, एक बैल व दोन वासरांचा मृत्यू झाला. वऱ्हाडातील बुलडाणा, अकोला, वाशीम या तीनही जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली.

जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. बुलडाणा तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर आला. पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळण्याची चिन्हे आहेत. 

सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत : हवामान विभाग)  कोकण : वेंगुर्ला १४०, दोडामार्ग ६०, वैभववाडी, मालवण, भिरा, कणकवली प्रत्येकी ५०, कुडाळ, महाड प्रत्येकी ३०, माणगाव, उरण, श्रीवर्धन प्रत्येकी २०. मध्य महाराष्ट्र : शिरपूर ११०, तळोदा ७०, जावळी मेढा ६०, कराड, सोलापूर प्रत्येकी ५०, जामनेर, सिंधखेड प्रत्येकी ४०, अमळनेर, दहिवडी, जामखेड, मालेगाव, पन्हाळा, पाथर्डी, शेवगाव, शिराळा, शिरोळ, तासगाव, विटा, वाई प्रत्येकी ३०, कवठेमहांकाळ, कोल्हापूर, कोरेगाव, महाबळेश्वर, मंगळवेढा, मिरज, पंढरपूर, सातारा प्रत्यकी २०.मराठवाडा : वाशी ११०, उदगीर ९०, केज, सेलू प्रत्येकी ७०, नांदेड ६०, उमरगा ५०, आष्टी, गेवराई, निलंगा, शिरूर कासार, उमरी प्रत्येकी ४०, भोकरदन, धारूर, शिरूर अनंतपाळ, सोयेगाव प्रत्येकी ३०, अर्धापूर, जालना, खुलताबाद, मानवत, मुखेड, उस्मानाबाद, पाथरी, पाटोदा प्रत्येकी २०.विदर्भ : बुलडाणा, रामटेक, तुमसर प्रत्येकी ५०, सेलू, शेगाव प्रत्येकी ४०, अकोला, चांदूर, नांदुरा, परतवाडा, संग्रामपूर, तेल्हारा, तिरोडा प्रत्येकी ३०, अमरावती, गोरेगाव, हिंगणा, जळगाव जामोद, कळमेश्वर, कामठी, कोपर्णा, मौदा, उमरेड, प्रत्येकी २०. 

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस शक्य
मॉन्सूनने राज्याचा बहुतांशी भाग व्यापल्यानंतर राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. आज (ता. २५) कोकणात काही ठिकाणी अति जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळणार आहेत. तर, विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...