agriculture news in Marathi rain and hailstorm in Khandesh Maharashtra | Agrowon

खानदेशात सलग तिसऱ्या दिवशीही गारपीट, पावसाचा दणका 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 मार्च 2021

खानदेशात सलग तीन दिवस गारपीट व वादळी पावसाने रब्बी पिकांची मोठी हानी झाली आहे. शेतकरी कोलमडला असून, तातडीने पंचनामे पूर्ण करून भरपाईची मागणी केली जात आहे.

जळगाव ः खानदेशात सलग तीन दिवस गारपीट व वादळी पावसाने रब्बी पिकांची मोठी हानी झाली आहे. शेतकरी कोलमडला असून, तातडीने पंचनामे पूर्ण करून भरपाईची मागणी केली जात आहे. पंचनाम्यांची कार्यवाही मंगळवारी (ता.२३) सुरू झाली. ही कार्यवाही येत्या दोन दिवसांत पूर्ण करून अहवाल प्रशासनाला सादर करण्याच्या सूचना धुळे, जळगावात पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. 

पंचनामे सुरू आहेत. परंतु मंगळवारी (ता. २३) रात्री ज्या भागात गारपीट, पाऊस झाला, त्या भागाला वगळण्यात आले होते. आता या भागातील नुकसानीची माहिती संकलित करून तातडीने भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. खानदेशात मंगळवारी सायंकाळी, रात्रीच्या वादळी पावसासह गारपिटीने नुकसानीची आकडेवारी दुप्पट झाली आहे. आता सुमारे ४०० कोटींच्या पिकांची हानी झाली आहे. शिवाय गावांमध्ये गोठ्याची पत्रे उडून नुकसानीची माहिती आहे. तसेच काही भागांत पशुधनाची देखील हानी झाल्याची माहिती आहे. 

मंगळवारीही नुकसान 
मंगळवारी रात्री जळगाव, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, जामनेर, पाचोरा, पारोळा या भागांत वादळी पाऊस झाला. तर धुळ्यातील साक्री, धुळे भागांत गारपीट व वादळाने नुकसान झाले. जळगाव, एरंडोल भागांत सुमारे ३५ मिनिटे वादळ झाले. यात पिके भुईसपाट झाली. बीजोत्पादनाचा कांदा, ज्वारी आडवी झाली आहे. तसेच मका, बाजरी पिकाचे देखील ६० ते ७० टक्के नुकसान झाले आहे. धुळ्यातही कांदा, मका, ज्वारी, बाजरी व भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. टोमॅटो, कलिंगडाचे पीक पुरते हातचे गेल्याची स्थिती साक्री, धुळे भागांत झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.  

 
 


इतर अॅग्रो विशेष
निर्यातीसाठी संत्रा आंबटच!  सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...