विदर्भात वादळी पाऊस, गारपिटीची शक्यता

हवामान
हवामान

पुणे : पाेषक हवामानामुळे मध्य महाराष्ट्रातीन काही ठिकाणी दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. ११) सोलापूर, कोल्हापुरात हजेरी लावल्यानंतर मंगळवारी (ता. १२) नाशिक जिल्ह्यातील येवला, नांदगाव तालुक्यात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे द्राक्ष बागा आणि कांदा पिकाला फटका बसला आहे. पावसाला पोषक हवामानामुळे आजपासून (ता. १४) विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता अाहे. तर उद्या (ता. १५) विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राजस्थान आणि परिसरावर आज (ता. १४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे.   राजस्थान आणि परिसरावर आज (ता. १४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने राज्यातील थंडी कमी झाली आहे. तर कर्नाटक किनारपट्टी आणि लगतच्या अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून, पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मालदीव बेटांपासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बुधवारी सकाळपासून (ता. १३) उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते. ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरणामुळे राज्याच्या तापमानात वाढ झाली अाहे. विदर्भातील एखाद दुसरा अपवाद वगळता राज्यात सर्वत्र किमान तापमान १५ अंशांच्या पुढे सरकले अाहे. नागपूर येथे राज्यातील नीचांकी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने अाज (ता. १४) विदर्भातील अकोला, अमरावती जिल्हा आणि परिसरात हलका पाऊस पडेल. तर शुक्रवारी (ता. १५) विदर्भातील अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवमताळ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.  बुधवारी (ता. १३) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १६.७ (३.८), जळगाव १७.४ (३.८), कोल्हापूर १९.३ (३.१), महाबळेश्‍वर १६.६ (२.४), मालेगाव २०.४ (८.८), नाशिक १६.४, सातारा १७.४ (३.२), सोलापूर २०.१ (३.२), रत्नागिरी २१.४ (२.१), डहाणू २१.३ (३.५), आैरंगाबाद १८.४ (४.८), अकोला १९.२ (३.३), अमरावती १७.० (०.३), बुलडाणा २१.६ (५.४),चंद्रपूर १५.४ (-१.३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com