ठिकठिकाणी गारपीट, पावसाचा दणका 

पावसामुळे शेतातील कांदा, द्राक्ष, आंबा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. भाजीपाला, पिकांसह उन्हाळी हंगामातील पिकांनाही फटका बसत आहे.
Nashik
Nashik

पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात गारपीटीसह जोरदार पाऊस पडला. पावसामुळे शेतातील कांदा, द्राक्ष, आंबा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. भाजीपाला, पिकांसह उन्हाळी हंगामातील पिकांनाही फटका बसत आहे. 

गेल्या आठवड्यापासून पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. रविवारी (ता.2) दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. पुणे जिल्ह्यातील हवेली, दौंड, भोर, मावळ, मुळशी, वेल्हे, जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यात जोरदार वादळी गारांचा पाऊस पडला. भोर (जि. पुणे) तालुक्यातील चेलाडी येथे (रविवार) दुपारी तीन वाजता अंगावर वीज कोसळून दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. साताऱ्यातही काही भागांत जोरदार पाऊस झाला. तर दोन जणांचा विजपडून मृत्यू झाला. नाशिकमधील इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात जवळपास एक तास गारपीट झाली. नगर जिल्ह्यातही नेवासा, शेवगाव, श्रीरामपूर भागात, संगमनेर,शिर्डी भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडल्या. सोलापूर जिल्ह्यात बार्शी, सोलापूर शहर परिसरातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. मराठवाड्यातही परभणी शहर व तालुक्यातील अनेक भागात ढगांच्या गडगडाटात हलका पाऊस झाला. खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजेराय परिसरात दोन जणांना मृत्यू झाला. विदर्भातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.  आंब्याचे नुकसान  कोकणातही मुरबाड (ठाणे) तालुक्यातील आल्याची वाडी मोधळवाडी येथे गारपीटीसह वादळी पाऊस झाला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही अंशी ढगाळ तर अधूनमधून ऊन पडत होते. यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. फळांची मोठी गळ होत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com